‘तू नक्की कोणत्या गिरणीचे पीठ खाते’, शहनाझ गिलच्या फोटोवर चाहत्याची लक्षवेधी कमेंट


‘बिग बॉस 13’ ची स्पर्धक शहनाझ गिल आपल्या वेगवेगळ्या स्टाईलने आणि अंदाजाने प्रेक्षकांना तिच्याकडे आकर्षित करत असते. शहनाझ नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. तसेच मोठ्या प्रमाणामध्ये सोशल मीडियावर सक्रिय असते. आपल्या वेगवेगळ्या स्टाईलचे आणि पोझचे फोटो सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांसाठी शेअर करत असते. तिचे चाहते देखील तिचे फोटो‌ बघण्यासाठी उत्सुक असतात. सोशल मीडियावर तिचा कोणताही फोटो शेअर होता क्षणी वेगाने व्हायरल होत असतो. परंतु यावेळी तिच्या नव्या लूकने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. तिचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ( Shehnaaz gill’s stunning photo viral on social media)

शहनाझने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तिने बॅकलेस फ्लोरल ड्रेस घातला आहे. या फोटोमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. ती या फोटोमध्ये बेडवर झोपून सेंशुअल पोझ देताना दिसत आहे. तिच्या या अदा तिच्या चाहत्यांना खूप आवडल्या आहेत. तिचे चाहते तिच्या या फोटोंचे खूप कौतुक करत आहेत.

या फोटोमध्ये शहनाझने तिच्या केसांची स्टाईल देखील वेगळ्याच अंदाजात केली आहे. तिच्या या ग्लॅमरस लूकने तिच्या चाहत्यांचे मन जिंकले आहे. तिच्या एका चाहत्याने या फोटोवर कमेंट करून लिहिले आहे की, “शहनाझ तू नक्की कोणत्या गिरणीचे पीठ खाते, जेणेकरून तू एवढी हॉट दिसते.”

शहनाझ गिल या आधी बादशाहसोबत ‘फ्लाय’ या गाण्यात दिसली होती. याआधी देखील ती अनेक म्युझिक व्हिडिओमध्ये दिसली होती. ‘बिग बॉस 13’ मध्ये तिला खूप लोकप्रियता मिळाली होती. यानंतर तिला अनेक प्रोजेक्टच्या ऑफर आल्या. ती लवकरच ‘हौसला रख’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत दिलजीत दोसांझ दिसणार आहे. या चित्रपटाची शूटिंग कॅनडामध्ये पूर्ण झाली आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-समर सिंगच्या नवीन गाण्याचा यूट्यूबवर धुमाकूळ; पाहायला मिळाला नीलम गिरीचा हॉट अंदाज

-आशुतोष पत्कीने शेअर केला जिममधला फोटो; पाहायला मिळाला बबड्याचा ‘फिट ऍंड फाईन’ लूक

-‘मैं तो खड़ी थी आस लगाए…’, रितिका श्रोत्रीच्या निरागसतेने नेटकऱ्यांना पाडली भुरळ


Leave A Reply

Your email address will not be published.