समर सिंगच्या नवीन गाण्याचा यूट्यूबवर धुमाकूळ; पाहायला मिळाला नीलम गिरीचा हॉट अंदाज


सध्या यूट्यूबवर भोजपुरी गाणे धमाल करत आहेत. भोजपुरी चित्रपटसृष्टीतील कलाकार आपल्या गाण्यांमुळे सर्व चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहेत. दररोज नवनवीन गाणे ते प्रदर्शित करत आहेत. अशातच आता आणखी एका भोजपुरी स्टारने आपले नवीन गाणे प्रदर्शित केले आहे. तो स्टार इतर कुणी नसून समर सिंग आहे. समर सिंगच्या गाण्याला यूट्यूबवर जोरदार प्रतिसाद मिळत आहे. (Samar Singh New Song Tu Bhi Coronaa Se Kam Nahi Video Song Release)

समर सिंगच्या नवीन गाण्याचे नाव ‘तू भी कोरोना से कम नहीं’ असे आहे. समरचे हे गाणे स्पीड रेकॉर्ड्स भोजपुरी या यूट्यूब चॅनेलवर प्रदर्शित करण्यात आले आहे आणि अपेक्षितरीत्या जोरदार धुमाकूळ घालत आहे. खरं तर या गाण्याचा ऑडिओ काही आठवड्यांपूर्वीच प्रदर्शित करण्यात आला होता, ज्याला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. दुसरीकडे आता या गाण्याचा व्हिडिओही आला आहे. हा व्हिडिओही सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या गाण्याला एकाच दिवसात दीड लाखांपेक्षाही अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

या गाण्यात समर सिंग आणि त्याची अभिनेत्री नीलम गिरी दोघेही स्टायलिश लूकमध्ये दिसत आहेत. विशेषत: त्याची अभिनेत्री खूपच हॉट आणि ग्लॅमरस दिसत आहे. या दोघांच्या केमिस्ट्रीने चाहत्यांना भुरळ घातली आहे.

 

समर सिंगच्या गा गाण्याची पहिली झलक आणि टिझर पाहून चाहते खूपच उत्साहित झाले होते. तसेच व्हिडिओची आतुरतेने वाट पाहत होते. जसे गाणे प्रदर्शित झाले, चाहत्यांनी लगेच हे गाणे व्हायरल करण्यास सुरुवात केली. चाहत्यांकडून या गाण्याल कमालीचा प्रतिसाद मिळताना दिसत आहे. समर सिंग गाण्यात अभिनेत्रीला म्हणत आहे की, “तू पण कोरोनापेक्षा कमी नाही. आपल्या कातील अदांनी तू पण जीव घेते आणि तुझ्या तावडीत सापडण्यापासून वाचणे खूप कठीण होते.” पुढे अभिनेत्री म्हणते की, “तुझ्यासारखे कितीतरी मागे- पुढे फिरतात. गुलाब देऊन माझ्या पाया पडतात.” यावर समर म्हणतो, “अरे सर्वांप्रमाणे समजतेस का? तुझ्या तावडीत गल्लीतील अनेक मुलं, तू पण कोरोनापेक्षा कमी नाही.”

गाण्याची ही संकल्पना खूपच मजेशीर आहे. त्यामुळे या व्हिडिओवर चाहते लाईक्स आणि कमेंट्समार्फत कौतुकाचा वर्षाव करत आहेत. स्पीड रेकॉर्ड्स भोजपुरी प्रस्तुत हे गाणे समर सिंग आणि खुशबू तिवारी केटी यांनी गायले आहे. या गाण्याचे लिरिक्स यादव राजने लिहिले आहेत. आर्या शर्माने या गाण्याला संगीत दिले आहे. या गाण्याची संकल्पना हॅप्पी सिंगची आहे. या गाण्याचे डीओपी दीपक पाल आणि एमसी ब्रो आहेत, तर एडिटर कीर्तिमान, डीआई मोईन अली आणि कोरिओग्राफर रियांश व मानवीन आहेत. या गाण्याचे दिग्दर्शिक ऐश्वर्य शर्मा आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-आशुतोष पत्कीने शेअर केला जिममधला फोटो; पाहायला मिळाला बबड्याचा ‘फिट ऍंड फाईन’ लूक

-‘मैं तो खड़ी थी आस लगाए…’, रितिका श्रोत्रीच्या निरागसतेने नेटकऱ्यांना पाडली भुरळ

-कंगना रणौत करणार इंदिरा गांधींवर आधारित चित्रपटाचे दिग्दर्शन; म्हणाली, ‘माझ्यापेक्षा इतर कोणीही…’


Leave A Reply

Your email address will not be published.