Monday, July 1, 2024

‘शेहजादा’मधील कार्तिक आर्यनचा लूक पाहून वाढली चाहत्यांची उत्कंठा, पण बदललीय…

अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) त्याच्या चित्रपटांमुळे सतत चर्चेत असतो. त्याचा शेवटचा चित्रपट ‘भूल भुलैया 2’ने प्रचंड चर्चा रंगवली होती. प्रेक्षकांना त्याचा चित्रपट इतका आवडला की, ते अजूनही कार्तिकच्या क्रेझमध्ये मग्न आहेत. त्याच्याबद्दलची क्रेझ अजून कमी झालेली नाही आणि कार्तिक त्याच्या दुसऱ्या चित्रपटासह परतला आहे. अलीकडेच कार्तिक आर्यनने ‘शेहजादा’ चित्रपटातील त्याचा फर्स्ट लुक शेअर केला आणि चित्रपटाची नवीन रिलीझ डेटही जाहीर केली. हा चित्रपट या वर्षी नोव्हेंबरमध्ये रिलीझ होणार होता पण आता त्याची तारीख बदलली आहे.

‘शेहजादा’चा फर्स्ट लूक
कार्तिक आर्यनने शनिवारी (१६ जुलै) दुपारी सोशल मीडियावर त्याच्या आगामी ‘शेहजादा’ चित्रपटातील पहिला लूक शेअर केला. अभिनेत्याने चित्रपटासाठी नवीन रिलीझची तारीख देखील जाहीर केली, जी यापूर्वी नोव्हेंबरमध्ये होती. कार्तिकच्या पोस्टनुसार, चित्रपट आता पुढच्या वर्षी फेब्रुवारीमध्ये रिलीझ होईल. चाहत्यांना या चित्रपटातील कार्तिकचा लूक आवडला. यासोबतच अनेकांनी याच्या रिलीझला होत असलेल्या विलंबाबाबत दुःखही व्यक्त केले. (shehzada first look of karthik aaryan release date changed)

शहजादामध्ये कार्तिकचा डॅशिंग लूक
शनिवारी दुपारी कार्तिकने चित्रपटातील स्वत:चा एक फोटो शेअर केला आणि त्याला कॅप्शन दिले, “#शेहजादा घरी परतला. १० फेब्रुवारी २०२३.” फोटोमध्ये, एक कार्तिक कॅमेराकडे धावत आहे. शहजादामध्ये क्रिती सेनन (Kriti Sanon) देखील आहे, जिला कार्तिकने त्याच्या ट्वीटमध्ये इतर क्रू सदस्यांसह टॅग केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा