Saturday, July 6, 2024

शर्लिन चोप्राचा शाहरुख खानवर गंभीर आरोप; म्हणाली, ‘त्याच्या पार्टीत लोक पांढऱ्या पावडरचे सेवन…’

बॉलिवूड किंग शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान सध्या एनसीबीच्या ताब्यात आहे. त्यामुळे शाहरुख खान सध्या खूप चर्चेत आहे. आर्यनला रेव्ह पार्टीमध्ये अटक करण्यात आली आहे. त्याला अंमली पदार्थांचे सेवन तसेच देवाण-घेवाण केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. अशातच त्याच्या फोनमधून एक विवादित संभाषण समोर आले आहे. ही बातमी समजता क्षणी मॉडेल आणि अभिनेत्री शर्लिन चोप्राने तिच्या ट्विटर अकाऊंटवरून एका जुन्या मुलाखतीचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. यामध्ये ती आयपीएलमधील कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) या टीमचा उच्चार करत आहे.

या व्हिडिओमध्ये शर्लिन सांगते की, “बॉलिवूडमधील किंवा आयपीएलमधील कोणतीही पार्टी अंमली पदार्थांशिवाय होत नाही. कारण लोकांचा असा समज आहे की, नशा येणाऱ्या पदार्थांचे जोपर्यंत ते सेवन करत नाही तोपर्यंत पार्टीमध्ये रंगत येणार नाही आणि तुम्हाला मज्जा येणार नाही.” शर्लिन चोप्राने या मुलाखतीत शाहरुख खानचे नाव घेतले आहे. आयपीएलमधील केकेआर टीमचा शाहरुख खान हा मालक आहे. ती या व्हिडिओमध्ये सांगत आहे की, “केकेआरच्या पार्टीमध्ये मी अनेक स्टार्सच्या बायकांना पांढऱ्या पावडरचे सेवन करताना बघितले आहे.” (Sherlyn Chopra commented on shahrukh khan KKR party said people were taking white powder)

शर्लिन चोप्राने काही दिवसांपूर्वी पॉर्नोग्राफी प्रकरणात अडकलेल्या राज कुंद्रावर गंभीर आरोप लावला होता. त्यामुळे ती खूपच चर्चेत आली होती. तिने सांगितले होते की, राज कुंद्राने तिला ऍडल्ट इंडस्ट्रीमध्ये आणले होते. एवढंच नाही, तर तिने त्याच्याबाबत इतर अनेक गोष्टी सांगितल्या होत्या. शर्लिनने सांगितले होते की, “राज कुंद्राला माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवायचे होते, परंतु मी नकार दिल्यावर तो तिला धमक्या देऊ लागला.”

शर्लिनने सांगितले की, “२७ मार्च, २०१९ रोजी राज कुंद्रा माझ्या घरात जबरदस्ती घुसून आला आणि त्याने माझ्यासोबत जबरदस्ती करण्याचा देखील प्रयत्न केला होता.”

शर्लिनने एप्रिल २०२१ मध्ये राज कुंद्रा विरोधात लैंगिक शोषणाचा आरोप करत एफआयआर दाखल केली होती. शर्लिन आणि राजने अनेकवेळा एकत्र काम केले आहे. ती एका ऍडल्ट फिल्मसाठी खूप पैसे घेत होती. राज कुंद्राने यावर स्पष्टीकरण दिले होते की, शर्लिनने केलेले सगळे आरोप खोटे आहेत. तो केवळ पैशासाठी हे सगळं करत आहे. यामुळे ती खूप चर्चेत आली होती.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-उर्वशी रौतेलाच्या हवेत उडणाऱ्या केसांनी चाहत्यांना केले घायाळ; अदा पाहून नेटकरी म्हणाले, ‘उफ्फ!’

-एनसीबी शाहरुख खानला लक्ष्य करतेय? लावलेल्या आरोपांवर झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी तोडले मौन

-‘तिचं नाव सुद्धा आठवत नाहीये…’, रणवीर सिंगच्या गर्लफ्रेंडबद्दलच्या ‘या’ प्रश्नावर सलमान खानचं तडकीफड उत्तर

हे देखील वाचा