Friday, July 5, 2024

वाद चांगलाच पेटला! शर्लिनने राखी सावंतला ‘टकली’ म्हणत वक्तव्याला दिले प्रतिउत्तर…

बॉलिवूडमध्ये वादग्रस्त व्यक्तीमत्व असणारा प्रसिद्ध दिग्दर्शक साजिद खान याने टेलिव्हिजनवरील लोप्रिय कर्यक्रम बिग बॉसमध्ये एंट्री केल्याने अनेक अभिनेत्रींनी आपली नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे साजिद सोबतच काही अभिनेत्रींनी बिग बॉसवरही निशाना साधला होता. आता या वादावरुन प्रसिद्ध अभिनेत्री राखी सावंत आणि शर्लिन चोप्रा यांच्यामध्ये चांगलाच वाद पेटलेला दिसत आहे.

अभिनेत्री शर्लिन चोप्रा (Sherlyn Chopra) हिने देखिल मीटु मोहिमद्वारे साजिद खानवर आरोप केले होते मात्र, तिने बिग बॉसमध्ये साजिदला घेण्यावरही आपले तिखट वक्तव्य दिले होते. सोबतच तिने साजिदविरोधात पोलिस्टेशनमध्ये तक्रार देखिल नोंदवली होती. मात्र,साजिदच्या तक्रारीमध्ये मुंबई पोलिसांनी शर्लिनला साथ दिला नाही, तिच्या अशा वक्तव्यानंतर अभिनेत्री राखी सावंत (Rakhi Sawant) हिने एका व्हिडिओद्वारे साजिदला पाठिंबा देताना दिसली, आणि काही दिवसांपूर्वी तिने शर्लिनचा मजाक देखिल उडवला होता. आता शर्लिन देखिल शांत बसणाऱ्यातली नाही, तिनेही राखीच्या या वक्तव्याला सडेतोड उत्तर दिले आहे.

शर्लिनने साजिदवर नोंदवलेल्या तक्रारीनंतर तिला पोलीसांनी साथ दिली नाही. शर्लिनच्या अशा वक्तव्यावर राखीने पैपराजीसमोर अभिनेत्रीची फजिती केली होती. तिने शर्लिनचा खूप मजाक उडवला होता. राखीने साजिदला स्वत:चा भाऊ मानत म्हणाली की, “जर साजिद दोषीच नाही तर,पोलीस का साथ देणार, न्यायालयाने साजिदला फाशी किंवा काला पाणी अशी शिक्षा तर नाही दिली ना. तुम्हा चार किलोचा मेकअप करत, साडी घालून मीडियासमोर दुसऱ्यांवर आरोप करता, तुम्हाला लाज नाही वाटत का? चुल्लु भर पाण्यामध्ये डुबून मरुन जा तुम्ही?”

राखीच्या अशा वक्तव्यानंतर शर्लिन चोपडा खूप रागवली आणि तिनेही राखीवर निशाना साधत व्हिडिओ शेअर करत, राखीला ‘टकली’ म्हणाली असून तिने राखीच्या वैयक्तीक आयुष्याला चव्हाट्यावर आणले आहे. शर्लिनने राखीच्या वैयक्ती आयुष्यावर निशाना साधत म्हणाली, “आदिल पूर्वी तिचे जवढेही बॉयफ्रेंड होते ते सगळे टाईमपास होते. राखीला मेहनत करायची नाही आणि त्यामुळे ती सतत मीडियासमोर बडबड करत असते, जर हिंम्मत असेल तर माझ्यासमोर ऊभी राहून दाखव. राखी स्वत: 31 किलोचा मेकअप लावते आणि आपले टकले लपवण्यासाठी हेअर एक्सटेंशन लावत असते.”

शर्लिनच्या अशा प्रतिक्रियेनंतर राखी काय प्रतिक्रिया देईल याची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. राखी आणि शर्लिनचा वाद कुठपर्यत पोहोचेल हे पाहाणे फारच महत्वाचे ठरणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘बिग बॉस’च्या घरात अजून एका नात्यामध्ये वादाची ठिणगी, तुटेल का मैत्री? जाणून घ्या एका क्लीकवर
संगीतकार होण्याचे नव्हे, तर ‘हे’ होते अनु मलिक यांचे खरे स्वप्न, जाणून घेऊया त्यांची संगीत क्षेत्रातील कामगिरी

हे देखील वाचा