मागच्या महिन्यात जेव्हा राज कुंद्राला पोर्नोग्राफी केसमध्ये अटक झाली, आणि सर्वत्र खळबळ माजली. या केसमध्ये दिवसांगणिक नवनवीन खुलासे होत आहे. आजपर्यंत या केसमध्ये अनेक गोष्टी समोर आल्या अनेक लोकांची चौकशी झाली. या केसमध्ये नुकतीच मॉडेल शर्लिन चोप्राची चौकशी करण्यात आली. जवळपास आठ तास तिची चौकशी केली गेली. यादरम्यान तिने अनेक गोष्टी पोलिसांसमोर उघड केल्या. याच चौकशीदरम्यान शर्लिनने राजवर जबरदस्तीने किस करण्याचा देखील आरोप केला होता.
त्यानंतर शर्लिनने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक फोटो शेअर केला असून, या फोटोमुळे शर्लिन चांगलीच चर्चेत आली आहे. शर्लिनने पोस्ट केलेला फोटो ‘द शर्लिन चोप्रा’ अँपच्या शूटिंगच्या पहिला दिवसाचा असून हा फोटो तिने ट्विटरवर शेअर केला आहे. फोटो शेअर करताना तिने लिहिले, “२९ मार्च २०१९ चा दिवस, आर्म्सप्राइम आयोजित ‘द शर्लिन चोप्रा’ अँपच्या पहिल्या कंटेंटचे शूटिंग चालू होणार होते. माझ्यासाठी हा नवा अनुभव होता कारण याआधी कधीच मी अशा अॅपसोबत काम केले नव्हते. आशा आणि उत्साहाचे वातावरण होते.” तिचा हा फोटो सध्या सोशाल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. (sherlyn chopra shares photo with raj kundra)
29 मार्च, 2019 का दिन था।
आर्म्स्प्राइम द्वारा आयोजित 'द शर्लिन चोपड़ा' एैप का पहला कॉन्टेंट शूट होने जा रहा था।
मेरे लिए यह एक नया अनुभव था क्योंकि पहले कभी किसी एैप के साथ मैं जुड़ी नहीं थी।
उम्मीद और जोश का माहौल था। pic.twitter.com/TKZptsvnGe— Sherlyn Chopra (शर्लिन चोपड़ा)???????? (@SherlynChopra) August 11, 2021
दोन वर्षांपूर्वीच्या या फोटोमध्ये शर्लिन बिकिनी टॉप आणि शॉर्ट्समध्ये दिसत आहे. न्यूड, ग्लॅमरस, बोल्ड, टॉपलेस फोटोंसाठी चर्चेत असणाऱ्या शर्लिनने राजविषयी सर्व माहिती निसंकोच दिल्याचे समजत आहे. शर्लिनने सांगितले की, “माझी आणि राजची पहिली भेट २०१९ साली झाली. सुरुवातीला फक्त ग्लॅमरस व्हिडिओ तयार करण्याचीच आमच्यामध्ये चर्चा झाली होती. मात्र त्यानंतर आम्ही अडल्ट व्हिडिओ तयार करायला लागलो.” शर्लिन हे देखील म्हणाली की, “मला राज कुंद्राने सांगितले होते की, शिल्पाला देखील माझे व्हिडिओ आवडत आहे. त्यामुळे मला असे व्हिडिओ करायला प्रोत्साहन मिळाले.”
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
–आनंदाची बातमी! अभिनेत्री नयनताराने केली साखरपुड्याची पुष्टी; जाणून घ्या कोण आहे तो नशीबवान?
–सोनू अभिनेत्रीसोबत करत होता ‘तुम तो ठहरे परदेसी’ गाण्यावर डान्स; मध्येच आला चाहता आणि…
–मालदिवला नवऱ्यासोबत सुट्यांसाठी जात सना खानने एअरपोर्टवरच अदा केला नमाज; इंटरनेटवर व्हिडिओ व्हायरल