Wednesday, July 3, 2024

आयफा अवॉर्ड : पुरस्कारांची धमाल, दिग्गजांच्या आठवणीने निर्माण झालेले भावूक क्षण ‘या’ कारणांमुळे चर्चेत राहिला सोहळा

शनिवार (५ जून) रोजी बॉलिवूड जगतातील मानाचा भव्यदिव्य आयफा अवॉर्ड सोहळा रात्री पार पाडला. अत्यंत भव्यदिव्य आणि दिमाखदार अशा या पुरस्कार सोहळ्यात सिने जगतातील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती.  बॉलिवूड कलाकारांचे जबरदस्त परफॉर्मन्स आणि सिने तारकांच्या डान्सने या कार्यक्रमाची आणखीनच शोभा वाढवली. या कार्यक्रमात दिग्गज संगीतकार बप्पी लहिरी यांना श्रध्दांजली वाहताना शाहीद कपूरने केलेला डान्स सर्वांच्याच डोळ्याच पारण फेडणारा ठरला. अशा अनेक कारणांनी हा सोहळा चांगलाच चर्चेत राहिला. पाहूया याच कार्यक्रमातील काही  गाजलेले क्षण. 

अबुधाबीच्या येस आयलंडवर झालेल्या या पुरस्कारांच्या माध्यमातून आयफा पुरस्कार जवळपास दीड दशकानंतर संयुक्त अरब अमिरातीमध्ये पोहोचला. येथे पोहोचलेल्या सर्व तरुण कलाकारांमध्ये असेही काही कलाकार होते जे आपल्या पालकांचे बोट धरून याआधी या कार्यक्रमाला आले होते. असाच अनुभव अभिनेता अहान शेट्टीचा होता जो पूर्वी लहानपणी यूएईला आला होता आणि यावेळी त्याला सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार त्याला त्याचे वडील सुनील शेट्टी यांच्याकडून स्टेजवर मिळाला.

कार्यक्रमादरम्यान सर्वाधिक टाळ्या, शिट्ट्या गोंधळ अभिनेता पंकज त्रिपाठी स्टेजवर आल्यावर झाला. ‘पुरस्कार मिळाल्यानंतर जे काही सांगण्याच्या तयारीने मी आलो होतो ते सर्व काही तुम्ही केले. असेच अभिनेते पंकज त्रिपाठी म्हणाले. ‘ उर्वरित पुरस्कार विजेत्यांनीही यावेळी त्यांचे नातेवाईक, आई-वडील आणि प्रिय मित्रांची आठवण काढली. विकी कौशलने आपला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार दिवंगत अभिनेता इरफान खानला समर्पित केला. ‘सरदार उधम’ चित्रपटात इरफान खानने उधम सिंगची भूमिका केली होती. अशी आठवण त्याने यावेळी सांगितली.

कार्यक्रमादरम्यान आणखी अनेक भावनिक क्षण होते. आणि, इव्हेंटचा सर्वात भावनिक भाग म्हणजे अभिनेता सलमान खानने त्याच्या कारकिर्दीला मार्गदर्शन करणाऱ्या दिग्दर्शक आणि निर्मात्यांची आठवण काढली. खिशात पैसे नसताना सुनील शेट्टीच्या मदतीपासून ते ‘बीवी हो तो ऐसी’ चित्रपटात निर्माते जेके बिहारी यांचा विचित्र निर्णय, ‘फूल और पत्थर’ या चित्रपटाच्या घोषणेसाठी निर्माता रमेश तौरानी यांची मदत, सलमानचा ‘वॉन्टेड’ चित्रपटातून करिअरला पुनरुज्जीवित करण्यासाठी निर्माता बोनी कपूर यांच्याकडून मदत मिळाल्याचे भावनिक किस्से सांगताना डोळे ओलावले. यामुळेही या कार्यक्रमाला आणखीनच भावनिकरुप प्राप्त झाले.

IIFA 2022 विजेत्यांची संपूर्ण यादी 
सर्वोत्कृष्ट चित्रपट : शेरशाह
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन : विष्णुवर्धन (शेरशाह)
सर्वोत्कृष्ट अभिनेता : विकी कौशल (सरदार उधम)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री: क्रिती सॅनन (मिमी)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता: पंकज त्रिपाठी (लुडो)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री: सई ताम्हणकर (मिमी)
सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शन: एआर रहमान (अतरंगी रे), तनिष्क बागची, जसलीन रॉयल, जावेद मोहसीन, विक्रम मोंटेरोस, बी प्राक, जानी (शेरशाह)
सर्वोत्कृष्ट गायिका: असीस कौर (रतन लांबिया, शेरशाह)
सर्वोत्कृष्ट गायक: जुबिन नौटियाल (रतन लांबियां, शेरशाह)
सर्वोत्कृष्ट कथा (मूळ): अनुराग बसू (लुडो)
सर्वोत्कृष्ट कथा (अनुवादित): कबीर खान, संजय पूरण सिंग चौहान (८३)
सर्वोत्कृष्ट गीतकार: कौसर मुनीर (लेहरा दो, ८३)
सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेता: अहान शेट्टी (तडप)
सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेत्री: शर्वरी वाघ (बंटी और बबली 2)

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हे देखील वाचा