Monday, July 1, 2024

शिबानी दांडेकर प्रेग्नंट? मौन सोडत अभिनेत्री म्हणाली, ‘हे बेबी बंप…’

शिबानी दांडेकर (Shibani Dandekar) आणि फरहान अख्तर (Farhan Akhtar) हे दोघे लग्नबंधनात अडकल्यापासूनच चर्चेत आहेत. नवविवाहित जोडप्याने त्यांच्या लग्नाच्या रिसेप्शनपासून प्रत्येक समारंभाचे फोटो शेअर करत, सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. नुकतेच शिबानीने फरहानसोबतचे तिचे फोटो काही पोस्ट केले आहेत. हे फोटो त्याने त्याच्या जवळच्या मित्रांसाठी आयोजित केलेल्या पार्टीचे होते. ज्या फोटोंमध्ये शिबानीने तिचा नवीन टॅटू दाखवला होता. परंतु त्या टॅटूऐवजी तिच्या गरोदरपणाच्या अफवांनी जोर धरलेला पाहायला मिळाला. मात्र यावर आता अभिनेत्रीने स्वतः उत्तर दिले आहे.

बेबी बंप आहे का?
अँकर-अभिनेत्री शिबानी दांडेकरने आता सोशल मीडियावरील ती गरोदर असल्याचा दावा फेटाळून लावला आहे. बुधवारी (२ मार्च), तिने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला. ज्यामध्ये तिने तिचे ऍब्स फ्लॉंट केले. या व्हिडिओसोबत तिने लिहिले आहे की, “मी एक स्त्री आहे! मी गरोदर नाही. तो केवळ टकीला होता.” तिने या अफवांवर प्रतिक्रिया देत, हसणारे इमोजी देखील पोस्ट केले आहेत. (shibani dandekar got pregnant soon after marriage the truth of the baby bump came to the fore)

तीन दिवसांपूर्वी शिबानीने पार्टीनंतरचे काही फोटो शेअर केले होते. ज्यामध्ये ती तिच्या पतीच्या खांद्यावर डोके ठेवून रोमँटिक स्टाईलमध्ये दिसली होती. या फोटोमध्ये ती टाइट ड्रेसमध्ये दिसत होती आणि तिचे पोट थोडे बाहेर दिसत होते. त्यानंतर एका यूजरने कमेंट बॉक्समध्ये लिहिले की, “डिलीव्हरी कधी आहे?” तर दुसऱ्याने लिहिले, “ती तीन-चार महिन्यांची प्रेग्नंट आहे.” तर तिसऱ्याने लिहिले, “अचानक केलेल्या लग्नाचे कारण समोर आले.”

१९ फेब्रुवारीला बांधली रेशीमगाठ
फरहान आणि शिबानीचे १९ फेब्रुवारी २०२२ रोजी लग्न झाले. दोघांनी एक खासगी सोहळ्यात लग्न केले, ज्यामध्ये फक्त मित्र आणि कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. त्यांच्या लग्नाच्या काही दिवसांनंतर, फरहान आणि शिबानीने त्यांच्या संबंधित इंस्टाग्राम हँडलवर त्यांच्या लग्नाचे फोटो शेअर केले.

हेही वाचा – 

हे देखील वाचा