Saturday, June 29, 2024

लग्नानंतरच्या पार्टीमध्ये दिसला नववधू शिबानी दांडेकरचा ग्लॅमरस मॉडर्न अवतार

बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर यांचा विवाहसोहळा १९ फेब्रुवारी रोजी खंडाळा येथील फार्म हाऊसवर मोजक्याच पाहुण्यांच्या उपस्थितीत पार पडला. मागच्या बऱ्याच काळापासून या दोघांच्या लग्नाची सोशल मीडियावर चर्चा होती. मागच्या बऱ्याच काळापासून या दोघांच्या लग्नाची सोशल मीडियावर चर्चा होती. त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून, लग्नाच्या इतक्या दिवसांनंतरही त्यांच्या लग्नाच्या चर्चा आणि फोटो सोशल मीडियावर गाजताना दिसत आहे. लग्नाच्या पाच दिवसानंतर रितेश सिधवानीने या दोघांसाठी मुंबईमध्ये इंडस्ट्रीमधील सर्व कलाकारांना एक पार्टी दिली. या पार्टीमध्ये शिबानी आणि फरहान यांच्या लूकने तुफान बज निर्माण केला.

या सर्व पार्टीमध्ये शिबानीने खूपच लाईमलाइट मिळवले. या पार्टीमध्ये शिबानी भारतीय नववधू सारखी पारंपरिक वेशभूषेत दिसेल असे सर्वांना वाटले मात्र शिबानीने या पार्टीमध्ये एन्ट्री केल्यानंतर सर्वांच्याच नजरा तिच्यावर खिळल्या. आईस ब्लु रंगाच्या वेस्टर्न ड्रेसमध्ये शिबानी कमाल दिसत होती. तिचा लूक, स्टाईल, तिचा अंदाज तिच्या या लुकला चार चांद लावताना दिसला. नव्या नवरीचे हे असे रूप कदाचित तुम्हीही पहिल्यांदाच पाहिले असेल. तिने तिच्या या ड्रेससोबतच हाय बन, लॉन्ग ईयरिंग आणि हाय हील्स सॅंडल घातलेले होते. डीप नेक आणि लॉन्ग फ्रंट कट असलेल्या ड्रेसमध्ये शिबानी खूपच कॉन्फिडन्ट दिसली. फरहानने देखील तिला कॉम्प्लिमेंट करताना पांढऱ्या रंगाचे जॅकेट, पँट आणि काळ्या रंगाचा टीशर्ट घातला होता. दोघेही एकमेकांसोबत खूपच खुश दिसत होते.

शिबानी दांडेकर ही एक मराठमोळी अभिनेत्री आणि मॉडेल आहे. तिने तिच्या करिअरची सुरूवात एका अमेरिकन टीव्हीची सूत्रसंचालिका म्हणून केली होती. तिने आयपीएलच्या एका पर्वाचे देखील सूत्रसंचालन केले आहे. याचसोबत शिबानी ‘खतरों के खिलाडी’ या शोमध्ये देखील स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. शिबानी आणि फरहान अख्तर गेल्या चार वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते.

हेही वाचा –

हे देखील वाचा