Tuesday, July 9, 2024

शाहरुखबरोबर अभिनय केलेल्या अभिनेत्रीला चालणेही झाले कठीण, लखव्यामुळे अंथरुणाला आहे खिळून

मंडळी, लाखोंच्या संख्येत रोज कलाकार हे मुंबईत ऑडिशन देत असतात. त्यातील वीस ते तीस टक्के कालाकारांनाच फक्त काम मिळतं. त्यातूनही अगदी थोडे थोडकेच असतात ज्यांना आधी तर सिनेमांमध्ये मनासारखं काम मिळतं. काही अगदीच नशीबवान असतात ज्यांना शाहरुख, सलमान, अक्षय, अमिर किंवा सैफच्या सोबत अभिनय करण्याची संधी मिळते.

काम सुंदर असलं तर आणखीन नवनव्या भूमिका इतर अनेक चित्रपटांमध्ये मिळू लागतात. पण जर आपलं नशीबच जर खोटं असेल तर त्याला कुणीही काहीही करू शकत नाही. हो हे सगळं एक अभिनेत्रीसोबत झालं आहे. आणि ती सध्या भयंकर त्रासाचा सामना करत आहे. कोण आहे ही अभिनेत्री आणि कोणासोबत केलं होतं काम चला पाहुयात.

अभिनेत्री शिखा मल्होत्रा हिला अचानक १० डिसेंबर रोजी लखव्याचा झटका आला. तिला तातडीने उपचारासाठी कोकीलाबेन रुग्णालयात पुढील उपचारांसाठी दाखल करण्यात आलं होतं. या झटक्यामध्ये तिच्या शरीराचा उजवा भाग पूर्णतः प्रभावित झाला आहे. तिला तिच्या शरीराच्या उजव्या भागाची अजिबात हालचाल करता येत नाहीये. यानंतर पुढील उपचारांसाठी तिला केईएम रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे. इथेच तिच्यावर पुढील उपचार अगदी व्यवस्थितपणे केले जात आहेत आणि तिची योग्य ती काळजी देखील घेतली जात आहे.

माध्यमांशी बोलताना शिखा म्हणाली की,”माझ्या तब्येतीत हळू हळू सुधार होत आहे. परंतु ही प्रक्रिया खूपच धीमी आहे. मला हे देखील ठाऊक नाही की मी पुन्हा कधी पूर्वी सारखी चालू शकेन की नाही. मला आपल्या सर्वांच्या मदतीची आवश्यकता आहे. मला माझ्या चाहत्यांच्या प्रार्थनांची आणि मदतीची आवश्यकता आहे.”

शिखाने आतापर्यंत द वर्ल्ड अनसीन, रनिंग शादी, फॅन या सिनेमांमध्ये काम केलं आहे. तर तिचा कांचली हा राजस्थानी सिनेमा यावर्षी प्रदर्शित होणार होता परंतु कोव्हिड आणि लॉकडाऊन यामुळे पुढील वर्षापर्यंत त्याचं प्रदर्शन रखडलं आहे. कांचली या सिनेमाची चिंता सुद्धा तिला सतावत आहे कारण प्रमुख भूमिका साकारलेला हा तिचा पहिलाच सिनेमा आहे. आणि अशात तिला अकस्मात आलेलं हे आजारपण. यामुळे ती मानसिकरित्या देखील खचली आहे. परंतु तरीही ती उपचारांना योग्य प्रतिसाद देत असल्याने तिच्या तब्येतीत हळू हळू सुधारणा होत आहे.

हे देखील वाचा