बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा यांनी शर्लिन चोप्रावर ५० कोटी रुपयांचा मानहानीचा खटला दाखल केला आहे. राज कुंद्राला अश्लील चित्रपटाच्या निर्मितीबाबत अटक केल्यानंतर शर्लिन तिच्या वक्तव्यामुळे खूप चर्चेत आली होती. तिने राज कुंद्रावर जबरदस्ती केल्याचा आरोप लावला होता. या सगळ्यानंतर शिल्पा आणि राज यांच्या वकिलाने शर्लिनला सक्त ताकीद दिली होती. यानंतर शर्लिनने शिल्पा आणि राजवर मानसिक आणि लैंगिक छळ केल्याची तक्रार केली होती. या सगळ्याला उत्तर म्हणून शिल्पा आणि राजने तिच्यावर मानहानीचा खटला दाखल केला आहे.
पॉर्न प्रकरणामध्ये शर्लिन चोप्रा आणि राज कुंद्रामध्ये अनेक वाद वाढत चालले आहेत.. माध्यमांतील वृत्तांनुसार, शर्लिनवर कुंद्रा जोडप्याने ५० कोटी रुपयांचा खटला दाखल केला आहे. अधिकृत माहितीनुसार, शर्लिनने राज आणि शिल्पावर लावलेले सगळे आरोप खोटे आणि निराधार आहेत. तिने लावलेल्या आरोपांचा काहीही पुरावा नाही. शर्लिन हे सगळं पैशासाठी आणि राज आणि शिल्पाला बदनाम करण्यासाठी करत आहे.
शर्लिन विरोधात असे म्हटले जात आहे की, ती एप्रिल महिन्यात शिल्पा शेट्टीला म्हणाली होती की, तिने जी केस केली आहे, ती खोटी आहे आणि वकिलांनी सांगितले की, राज कुंद्रा विरोधात तक्रार कर. यासोबत हे लिहिले आहे की, शर्लिनने शिल्पाला फोन करून हे देखील सांगितले की, या सगळ्या गोष्टींची तिला खूप लाज वाटत आहे आणि कोणतीही अट न ठेवता ती ही केस मागे घेण्यास तयार आहे.
शर्लिन चोप्राने काही दिवसांपूर्वी पॉर्नोग्राफी प्रकरणात अडकलेल्या राज कुंद्रावर गंभीर आरोप लावला होता. त्यामुळे ती खूपच चर्चेत आली होती. तिने सांगितले होते की, राज कुंद्राने तिला ऍडल्ट इंडस्ट्रीमध्ये आणले होते. एवढंच नाही, तर तिने त्याच्याबाबत इतर अनेक गोष्टी सांगितल्या होत्या. शर्लिनने सांगितले होते की, “राज कुंद्राला तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवायचे होते, परंतु तिने नकार दिल्यावर तो तिला धमक्या देऊ लागला.”
शर्लिनने सांगितले की, “२७ मार्च, २०१९ रोजी राज कुंद्रा तिच्या घरात जबरदस्ती घुसून आला आणि त्याने तिच्यासोबत जबरदस्ती करण्याचा देखील प्रयत्न केला होता.”
शर्लिनने एप्रिल २०२१ मध्ये राज कुंद्रा विरोधात लैंगिक शोषणाचा आरोप लावत एफआयआर दाखल केली होती. शर्लिन आणि राजने अनेकवेळा एकत्र काम केले आहे. ती एका ऍडल्ट फिल्मसाठी खूप पैसे घेत होती. राज कुंद्राने यावर स्पष्टीकरण दिले होते की, शर्लिनने केलेले सगळे आरोप खोटे आहेत, तो केवळ पैशासाठी हे सगळं करत आहे. या वेळी ती खूप चर्चेत आली होती.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘बीच बॉम्ब’ मीरा राजपूतने शेअर केला तिचा ग्लॅमरस, मादक बिकिनी फोटो
-कार्तिक आर्यन नेटफ्लिक्सवर करणार जबरदस्त ‘धमाका’, ट्रेलर पाहून तुमच्याही अंगावर येतील शहारे