Monday, July 1, 2024

लहान असताना शिल्पा शेट्टीला ‘या’ कारणामुळे वाटायचा बहीण शमिता शेट्टीचा मत्सर

बॉलिवूडमधील सर्वात फिट अभिनेत्री म्हणून शिल्पा शेट्टी ओळखली जाते. शिल्पा शेट्टीने तिच्या अभिनयासोबतच तिच्या फिटनेसने आणि तिच्या डान्सने सर्वांनाच वेड लावले. वयाच्या ४० नंतरही शिल्पाने तिचा फिटनेस टिकवत स्वतःला मेंटेन ठेवले आहे. यासाठी खरंच शिल्पाचे कौतुक करावे तेवढे कमी आहे. शिल्पा सोशल मीडियावरही तुफान सक्रिय आहे. तिचे विविध रिल्स तुफान व्हायरल होताना दिसतात. शिल्पा अनेकदा तिची बहीण असलेल्या शमिता शेट्टीसोबत देखील बरेच रिल्स बनवताना दिसते. शिल्पा आणि शमिता यांचे नाते जगापासून लपलेले नाही. दोघी बहिणींचे एकमेकींवर जीवापाड प्रेम आहे. अनेकदा त्या विविध कार्यक्रमांना सोबत दिसतात. असे असले तरी एक वेळ अशी होती जेव्हा शिल्पाला शमिताचा मत्सर वाटत होता.

शिल्पा शेट्टी आणि शमिता शेट्टी या दोघी बहिणींमध्ये खूप प्रेम आहे. मात्र हे आता असले तरी शिल्पाला शमिताचा खूप मत्सर वाटत होता. त्या मत्सरात तिने जे काही कृत्य केले त्याबद्दल तिला आजही अपराधी वाटते. एका मुलाखतीमध्ये शमिताने आणि शिल्पाने याबद्दल सांगितले होते. ती म्हणाली की, त्यांची लहान असताना खूप भांडणं व्हायची. शिल्पा शमिताला खूप चिमट्या घ्यायची. शिल्पा म्हणाली, “माझ्या वडिलांनी मला सांगितले होते की, शमिता झाल्यानंतर जवळपास एक वर्ष मी स्वतःला वेगळी समजायची. कारण जिथे शमिता गोरी होती तिथे मी सावळी होती. यामुळे मला खूप असुरक्षसित वाटायचे. मी सतत माझ्या आईला विचारायची की, तू तिला गोरी आणि मला सावळी का बनवले?”

पुढे शिल्पा म्हणाली, “लहान असताना आम्ही खूप भांडायचो. जेव्हा शमिता झोपायची तेव्हा मी तिला चिमट्या काढायचे आणि ती रडायला लागायची. एका मी तिला कपाटात बंद करून ठेवले होते. जेव्हा ती बाहेर आली तेव्हा दुर्गा देवी होती. एकदा मी तिला सनमाइकचा तुकडा फेकून मारला होता. यामुळे तिच्या चेहऱ्याला लागले देखील होते.”

तत्पूर्वी शिल्पाच्या कामाबद्दल सांगायचे झाले तर ती अनेक डान्स रियॅलिटी शोमध्ये परीक्षकाच्या भूमिकेत दिसते. तर मागच्या वर्षी ती काही चित्रपटांमध्ये देखील दिसली होती. शमिता बिग बॉसमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाल्यानंतर कुठे दिसली नाही.

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
हंसिका मोटवानीच्या लग्नावर येतोय नवीन शो, ‘या’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार प्रदर्शित
आरोह वेलणकरने पोस्ट शेअर करत बिग बॉसमधल्या ‘त्या’ अनुभवांबद्दल व्यक्त केल्या भावना

हे देखील वाचा