Saturday, January 17, 2026
Home बॉलीवूड पती राज कुंद्राशिवाय शिल्पाने केले गणपती बाप्पाचे धुमधडाक्यात स्वागत; कॅमेरे पाहून जोडले हात

पती राज कुंद्राशिवाय शिल्पाने केले गणपती बाप्पाचे धुमधडाक्यात स्वागत; कॅमेरे पाहून जोडले हात

वर्षभर आपण ज्या सणाची आतुरतेने वाट बघत असतो, तो सण अगदी उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. अवघ्या काही तासातच गणपती बाप्पांचे आगमन होणार आहे. सर्व सामान्य नागरिकांपासून ते कलाकारांपर्यंत सर्वांच्या घरी बाप्पाच्या येण्याची तयारी पाहायला मिळत आहे. गणपती बाप्पांची आरास, नैवद्य पासून बाप्पांच्या मूर्तीपर्यंत अनेक गोष्टी करण्यात सर्व जणं रंगले आहेत. अशातच बाप्पांची मूर्ती घरी नेण्यासाठी असलेली लगबग देखील दिसत आहे. अनेक कलाकारांनी बाप्पांना अगदी वाजत गाजत जल्लोषात घरी नेले. याचे काही व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. अभिनेत्री शिल्पा शेट्टीनेही उत्साहाने बापाची मूर्ती घरी आणली आहे. ही मूर्ती घरी घेऊन जात असतानाचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर फिरत आहे.

या व्हिडिओमध्ये शिल्पा तिचे आराध्य असलेल्या गणपती बाप्पांना वाजत गाजत घरी नेत आहे. दरवर्षी प्रमाणे या वर्षीही शिल्पा तिच्या घरी लालबागच्या राजाच्या मूर्तीची स्थापना करणार आहे. या व्हिडिओमध्ये बाप्पांच्या आगमनामुळे शिल्पाला झालेला आनंद तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसून येत आहे. शिल्पाने यावेळेस एक साधा तरीही अतिशय आकर्षक असा कुर्ता आणि पायजमा घातला असून, डोळ्यावर गॉगल लावला आहे. यावेळी शिल्पसोबत तिचे काही मित्र आणि मैत्रिणीसुद्धा बाप्पांच्या स्वागतासाठी दिसून येत आहे. कोरोनाचा धोका असल्याने शिल्पाने मास्कसुद्धा घातले होते.

यावेळी शिल्पाने फोटोग्राफर्सला भरपूर पोझ देत फोटो काढू दिले. सध्या शिल्पा आणि तिचे कुटुंब अतिशय मोठ्या संकटाचा सामान करत आहे. जुलैमध्ये शिल्पाच्या नवऱ्याला राज कुंद्राला अश्लील चित्रपटांच्या निर्मितीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. त्यानंतर अनेक लोकांनी समोर येउन राज कुंदराविरोधात अनेक आरोप केले आहे. राजने या उद्योगातून प्रचंड पैसे कमवला. त्याच्या या अटकेमुळे बॉलिवूडसोबतच उद्योग विश्वातही मोठी खळबळ उडाली होती. या अटकेमुळे शिल्पाचे देखील खूप नाव खराब झाले आणि तिला ट्रोलिंगचाही मोठा सामना करावा लागला. सध्या शिल्पा तिच्या कामावर परतली असून सोशल मेडियावरही ती सक्रिय झाल्याचे दिसत आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-Video: कितीही व्यस्त स्केड्युल असले, तरीही आईसोबत वेळ घालवणे विसरत नव्हता ‘खिलाडी’ अक्षय कुमार

-कुरकुरीत पकोडे पाहून शिल्पाच्या तोंडाला सुटले पाणी, एकटीनेच केले फस्त; थ्रोबॅक व्हिडिओ भन्नाट व्हायरल

-सुपरस्टार नागार्जुन यांची सून समंथाने फ्लॉन्ट केले ऍब्ज; पाहून तुम्हीही घालाल तोंडात बोटे

हे देखील वाचा