Saturday, June 29, 2024

शिल्पाजी, तुमची ऊंची किती हो..? नेहमीच्या प्रश्नाचं अभिनेत्रीने व्हिडिओ शेअर करत दिलं उत्तर; पाहा

शिल्पा शेट्टी नेहमीच तिच्या उंचीमुळे चर्चेत राहिली आहे. तिचे फॅन्स तिच्या उंचीबाबत अनेक अंदाज लावत असतात. प्रत्येकाच्या मनात हे जाणून घेण्याची उत्सुकता आहे की, शिल्पा शेट्टीची उंची नक्की आहे तरी किती? परंतु शिल्पा शेट्टी हिने तिच्या चाहत्यांची ही उत्सुकता संपवली आहे. तिने सगळ्यांना सांगितले आहे की, तिची उंची किती आहे.

शिल्पा शेट्टीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर काही व्हिडिओ शेअर केले होते. त्यात तिने प्रश्नांची मजेशीर उत्तरे दिली होती. यादरम्यान तिला तिच्या उंची बाबत प्रश्न विचारला होता.

शिल्पाला या व्हिडिओमध्ये प्रश्न विचारला की, तिची उंची किती आहे?, तेव्हा तिने उत्तर दिले की तिची उंची ‘पाच फूट साडे आठ इंच’ एवढी आहे. यासोबतच दुसऱ्या व्हिडिओमध्ये सुट्टयांसाठी तिला तिचं आवडत ठिकाण विचारलं, तेव्हा तिने चाहत्यांना ‘मालदीव’ हे उत्तर दिले.

शिल्पा शेट्टी हिने ‘बाजीगर’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर शिल्पाने ‘धडकन’, ‘मैं खिलाडी तू अनाडी’, आणि ‘अपने’ या चित्रपटांमध्ये तिने काम केले.

याव्यितिरिक्त शिल्पाला तिच्या फिटनेसमुळेही ओळखलं जातं आहे.

तिचे फिटनेसचे व्हिडिओ चाहत्यांमध्ये खूप प्रसिद्ध झाले आहेत. याबरोबरच ती योगा एक्स्पर्ट देखील आहे.

हेही वाचा-

किंग खानपासून ते फिट अभिनेत्री शिल्पा शेट्टीपर्यंत ‘या’ दिग्गज कलाकारांनी केला अपत्यप्राप्तीसाठी सरोगसीचा वापर

यालाच म्हणतात ‘आंखो का धोका’, शिल्पा शेट्टीचा नवीन व्हिडिओ पाहून तुम्हीही असेच म्हणाल

शिल्पा शेट्टीला शुभेच्छा देणं पडलं भलतंच महागात, चाहत्यांनी चांगलेच घेतले फैलावर

हे देखील वाचा