शटर खाली असूनही पोलीस कर्मचाऱ्याने केली दुकानदाराला मारहाण, शिल्पा शेट्टीच्या पतीने व्यक्त केला संताप; म्हणाला…

Shilpa Shetty Husband Raj Kundra Raging On The Police Said The Law Did Not Give You The Right To Be A Judge And Slapped Anyone


कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेमुळे संपूर्ण देशाची अवस्था दयनीय झाली आहे. सर्व बाजूंनी या व्हायरसशी संक्रमित झालेल्या पीडितांचे नातेवाई त्यांच्यावर उपचार करण्यासाठी सुविधा कमी पडत असल्याची तक्रार करत आहेत. अशामध्ये देशातील अनेक राज्य शासनाने व्हायरस न पसरण्यासाठी लॉकडाऊनचा पर्याय वापरला आहे. लॉकडाऊनमुळे या व्हायरसच्या प्रकरणांमध्ये घट होताना दिसत आहे. परंतु याचा सामान्य व्यक्तींच्या पोटाला फटका बसत आहे. रोजंदारीवर काम करणाऱ्या व्यक्तींचे उत्पन्नाचे सर्व स्त्रोत संपुष्टात आले आहेत.

अशामध्येच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो राजस्थानचा असल्याचे सांगितले जात आहे. या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, पोलीस कपड्यांच्या दुकानावर पोहोचतात, ज्याचे शटर खाली असते. पोलीस शटर उघडवतात आणि एक पोलीस दुकानदाराला चापट मारू लागतो. दरम्यान शेजारील काही लोक पोलिसाला दुकानदाराला न मारण्याची विनंती करू लागतात. यावर कलाकारांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रानेही यावर आपला संताप व्यक्त केला आहे.

सेलिब्रिटी फोटोग्राफर व्हायरल भयानीने हा व्हिडिओ शेअर केला आहे. त्याने व्हिडिओला कॅप्शनही दिले आहे. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘आयुष्यात कशा समस्या आल्या आहेत. एकीकडे तुम्हाला नियमांचे पालन करायचे आहे, परंतु दुसरीकडे तुमच्याकडे एक कौटुंबिक जबाबदारी आहे आणि आपल्या कर्मचाऱ्यांचा पगारही द्यायचा आहे. हा व्हिडिओ राजस्थानचा आहे, जिथे एका दुकानदाराने आपले दुकान उघडले होते, तरीही त्याचे शटर बंदच होते.’

पोलीस कर्मचारी दुकानदाराचे शटर उघडून त्याला चापट मारू लागतो. पोलीस कर्मचाऱ्याच्या या कृत्यावर काही कलाकारांनी तिखट प्रतिक्रिया दिल्या आहेत. तसेच या कारवाईवर प्रश्नचिन्हही उपस्थित केले आहेत.

राज कुंद्राने प्रश्नचिन्ह उपस्थित करत व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये लिहिले की, “पोलीस कर्मचारी त्यांना वाटेल, तेव्हा कुणालाही चापट मारू शकत नाहीत! #निर्दयी कायदा त्यांना जज, ज्यूरी बनण्याचा आणि फाशी देण्याचा अधिकार देत नाही.” राज कुंद्राच्या या कमेंटला २ हजारांपेक्षाही अधिक लाईक्स मिळाले आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-नवीन संगीतकार जोडी श्रोत्यांच्या भेटीला! ‘या’ फेसबुक पेजवरून गुरुवारी जाणार लाईव्ह, पाहा कसा सुरू झाला श्रेयसी अन् शौनक यांचा प्रवास

-‘काळ्या चिमण्या दिसंना झाल्यात, आवरा राव थोडंसं’, शालूचा डान्स पाहून चाहत्याची भन्नाट कमेंट

-पाकिस्तानी पंतप्रधान इमरान खानसोबत लग्नबंधनात अडकणार होती रेखा, अभिनेत्रीची आई कुंडली घेऊन थेट पोहोचली होती ज्योतिषीकडे


Leave A Reply

Your email address will not be published.