शिल्पा शेट्टीसाठी मागील काही महिने खूपच कठीण होते. राज कुंद्राला अटक झाल्यापासून शिल्पावर संकटांची मालिकाच सुरु होती. तरीही शिल्पाने धीराने सर्वच गोष्टींचा सामना केला. आज शिल्पा खूपच स्टेबल आहे. त्यात राज कुंद्राला जामीन मिळाला आणि त्यात तिचे टेन्शन कमी झाले. राज कुंद्राच्या अश्लील व्हिडिओमुळे झालेल्या अटकेमुळे राजसोबतच शिल्पाला मोठ्या प्रमाणावर टीका आणि ट्रोलिंगचा सामना करावा लागला. परंतु आज ती रिलॅक्स आहे. राज बाहेर आल्यानंतर शिल्पा आता स्वतःकडे लक्ष देत असून, सोशल मीडियावर सतत काही ना काही प्रेरणादायक पोस्ट करत आहे.
शिल्पा आता सोहळ मीडियावरही सक्रिय झाली आहे. ती सतत तिच्या आयुष्यात सुरु असणाऱ्या अनेक चढ-उतारांबद्दल सोशल मीडियावर सूचक पोस्ट शेअर करताना शिल्पा बरीच प्रकाशझोतात येत आहे. नयक्तीच तिने एक सोशल मीडिया पोस्ट शेअर केली असून, त्यात तिने ती यातून बाहेर पडत आहे असे सांगितले आहे.
एका पुस्तकातील एक कोट तिने पोस्ट केला असून, यामध्ये तिने स्वतःला स्ट्रॉंग ठेवण्याबाबद्दल सांगितले आहे. तिने पोस्ट केलेल्या कोटमध्ये लिहिले आहे की, “आपण सर्वांनी ऐकले आहे की, सहनशीलता आपल्याला स्ट्रॉंग बनवते आणि आपण कठीण परिस्थितीतून खूप काही शिकतो. हे खरे आहे, मात्र तेवढेही नाही जेवढे आपल्याला वाटते. कठीण वेळ आपल्याला अधिक चांगले बनवते, याकाळात केलेले काम देखील आपल्याला शक्ती देते. सहनशीलता आपल्याला ती ताकद देते जी आपल्याकडे आहे हे आपल्यालाच माहित नसते.”
तिची ही पोस्ट वाचून हे तर नक्कीच आहे की, शिल्पाला या संकट काळाने अधिकच टफ बनवले आहे. तिच्या आयुष्यातील सर्वात कठीण काळ तिला खूप काही शिकवून गेला. २० सप्टेंबरला राज कुंद्राला जामीन मिळाला आणि तो तब्बल दोन महिन्यांनी तुरुंगातून बाहेर आला. तिच्या येण्यामुळे शिल्पा देखील खूप खुश आहे.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-विजय देवरकोंडाने वाढदिवसानिमित्त आईला दिली ‘ही’ अनोखी भेट; पाहुन तुम्हीही व्हाल स्तब्ध
-ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार फेस्टिवल धमाका! ऑक्टोबरमध्ये भेटीला येतायेत ‘हे’ चित्रपट अन् वेब सीरिज