Wednesday, July 3, 2024

याला म्हणतात संस्कार! दुर्गाष्टमीच्या दिवशी शिल्पा आणि राजने मुलीचे पाय धुवून केली पूजा, व्हिडीओ होतोय व्हायरल

दरवर्षीप्रमाणे याही वेळी बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीने (Shilpa shetty)  नवरात्रीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला. शिल्पा आणि तिचा पती राज कुंद्राचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. स्वत: शिल्पाने कन्या पूजेचा व्हिडिओ इन्स्टावर शेअर केला आहे.

या व्हिडिओमध्ये शिल्पा मुलींना जेवण देत आहे, तर राज आपली मुलगी समिशाचे पाय धुवून आरती करत आहे. तसेच आपल्या मुलीचे आशीर्वाद घेतात. अभिनेत्रीने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ती मुलींना खाऊ घालत आहे. याशिवाय लहान मुलींची पूजा करून त्यांना खाऊचे वाटपही करण्यात येत आहे. शिल्पाने तिची मुलगी समिषा आणि मुलाची आरतीही केली. समीषाचे आशीर्वादही घेतले.

व्हिडिओमध्ये राज कुंद्रा आपल्या मुलीचे पाय धुतले आहे. नंतर पुसल्यानंतर मुलीच्या पायाला तिलक लावतात. यानंतर समिषाची आरती केली जाते. यानंतर मुलगी समिषाही वडील राज कुंद्राला आशीर्वाद देताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर चाहते खूप प्रेमाचा वर्षाव करत आहेत. व्हिडिओमध्ये, जेव्हा राज कुंद्रा आपल्या मुलीची पूजा करत होते, तेव्हा चाहत्यांना समिशाच्या क्यूट स्टाइलला पसंती मिळत आहे.

शिल्पा शेट्टी अशा बॉलिवूड अभिनेत्रींपैकी एक आहे जी आधुनिक असण्यासोबतच धार्मिक गोष्टींवरही विश्वास ठेवते. अभिनेत्रीची देवावर अतूट श्रद्धा आहे आणि ती प्रत्येक सणाच्या वेळी मोठ्या भक्तिभावाने पूजा करते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

दीपिका आणि रणवीरने २०१५ मध्येच केला होता साखरपुडा, कॉफी विद करणच्या शोची पहिली झलक समोर
ऋतिक रोशनच्या आईच्या वाढदिवशी साडी नेसून सबा आझाद पोहचली त्यांच्या घरी, व्हिडीओ व्हायरल

हे देखील वाचा