Tuesday, July 9, 2024

‘ये जानू चल झाडू मार’, म्हणत शिल्पा शेट्टीने सांगितले पतीला काम, त्याने केले असे काही की अभिनेत्री झाली रागाने लालबुंद

बॉलिवूडमधील सगळ्यात कूल कपलमध्ये अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांचा समावेश होतो. ते दोघेही नेहमीच सोशल मीडियावर त्यांचे वेगवेगळे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसाठी शेअर करत असतात. तसेच चाहत्यांकडून देखील त्यांना खूप पसंती मिळते. त्यांचा नुकताच एक नवीन व्हिडिओ सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. आणि तो व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होताना दिसत आहे.

या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, शिल्पा शेट्टी राज कुंद्रा याला काम सांगत म्हणते की, झाडू मार. पण तो तिला असे काही उत्तर देतो की, त्यावर शिल्पा रागाने लालबुंद होते. त्यांच्या हा व्हिडिओला 2 लाखांपेक्षाही जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. त्यांच्या या व्हिडिओवर सगळे चाहते जोरदार कमेंट करताना दिसत आहेत.

https://www.instagram.com/p/CNRZnK5BI1W/?utm_source=ig_web_copy_link

हा व्हिडिओ राज कुंद्रा याने त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. यामध्ये दिसते की, राज कुंद्रा हा मोकळा बसलेला बघून, शिल्पा शेट्टी त्याला म्हणते की, ‘ये जानू चल झाडू मार.’ त्यावर राज म्हणतो की, ‘मी नाही मारणार.’ परत यावर शिल्पा म्हणते की, ‘मी सांगितलंय ना एकदा झाडू मार.’

त्यावेळी राज म्हणतो की, ‘ठीक आहे तू म्हणते तर मी मारतो झाडू.’ शिल्पा मागे वळते, आणि राज तिला झाडू मारून पळून जातो. हा व्हिडिओ शेअर करत त्याने लिहिले आहे की, “लॉकडाऊन सुरू झाले आहे, आणि पुन्हा एकदा घरात काम चालू झालं. देवा कृपा करून आमची मदत कर.”

शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओला त्यांच्या चाहत्यांसोबतच अनेक कलाकारांनी देखील कमेंट केली आहे. दीपशिखा नागपाल, सारा खान यांसारख्या अनेक कलाकारांनी त्यांच्या या व्हिडिओवर कमेंट केली आहे. सोबतच सगळेजण त्यांचे खूप कौतुक करत आहेत. याआधी देखील या लव्ह बर्ड्सचे अनेक व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यांना देखील प्रेक्षकांनी भरपूर प्रतिसाद दिला होता.

शिल्पा शेट्टीच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, ती लवकरच ‘हंगामा 2’ आणि ‘निकम्मा’ या चित्रपटात दिसणार आहे. ‘हंगामा 2’ या चित्रपटात ती परेश रावल आणि मिजान जाफरी यांच्यासोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तसेच ‘निकम्मा’ या चित्रपटात ती अभिमन्यू दासानी याच्यासोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘दोन कोटी रुपये की, ६ मुलींसोबत हॉलिडे?’, प्रियांकाच्या प्रश्नावर कपिलने दिले जबरदस्त प्रत्युत्तर, ऐकून तुम्हीही खदखदून हसाल

-याला म्हणतात कहर! भोजपुरी स्टार अंकुश आणि शिल्पी यांच्या गाण्याचा राडा, दोन महिन्यातच मिळालेे १८ कोटींपेक्षा अधिक व्ह्यूज

-अनुपम खेर यांनी केला रस्त्यावर गाणाऱ्या मुलांचा सुंदर व्हिडिओ शेअर, म्हणाले ‘मला त्यांंना जग…’

हे देखील वाचा