बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी जितकी मॉडर्न आहे तितकीच धार्मिक देखील आहे. दिवाळी असो, होळी असो किंवा इतर कोणताही सण, शिल्पा नेहमीच मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात तो सण साजरा करत असते. सध्या देशभरात नवरात्रोत्सव मोठ्या उल्हासाने साजरा केला जात आहे. अशा परिस्थितीत शिल्पा शेट्टीनेही तिच्या घरी पूजा करण्याची संधी सोडली नाही. नुकत्याच झालेल्या महाअष्टमीच्या निमित्ताने तिने तिच्या घरी पूजा केली आहे. या पूजेचे काही फोटो शिल्पाने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. ज्यात ती मुलांसोबत पूजा करताना दिसत आहे. कन्या पूजनामध्ये अभिनेत्रीने मुलांना देवीची लाल चुनरी घालायला लावली असून, ‘जय माता दी’ लिहिलेल्या या चुनरीत मुली खूप गोड दिसत आहेत. शिल्पाने कन्या पूजेसाठी आलेल्या मुलींना हलवा, चना आणि पुरी हे जेवण ठेवले होते. शेअर केलेल्या फोटोंमध्ये शिल्पा स्वत: बसून या मुलींना जेवण वाढताना दिसत आहे.
यापूर्वी शिल्पाने नवरात्रोत्सवाचे फोटो आणि व्हिडिओ तिच्या चाहत्यांसोबत घरी शेअर केले होते. तिने मुलगा वियान आणि मुलगी समिशासोबत आरती करतानाचा एक व्हिडिओ देखील शेअर केला होता. व्हिडिओ शेअर करताना शिल्पाने कॅप्शनमध्ये एक मोठी नोटही लिहिली होती.

शिल्पाने लिहिले की, “माझे मंडे मोटिव्हेशन… माझी मुले आणि विश्वास. काही गोष्टी पुढच्या पिढीला समजावून सांगता येत नाहीत जोपर्यंत त्या स्वतः समोर घडताना दिसत नाहीत. माझ्यासाठी हे महत्वाचे आहे की, माझी मुले देखील त्याच संस्करांसह वाढतात जे माझ्या आई-वडिलांनी माझ्यामध्ये रुजवले आहेत. मला नेहमीच लहानपणापासूनच मुलांमध्ये विश्वासाची बीजे रुजवायची होती. कारण विश्वास आपल्याला बळकट बनवतो आणि जेव्हा आपण मोठे होतो, तेव्हा तो आपल्याला जीवनाचे अनुभव चांगल्या प्रकारे घेण्यास शिकवतो. तुम्हा सर्वांना शुभेच्छा.”
अलीकडे, शिल्पा शेट्टी आणि तिचे कुटुंब खूप चर्चेत होते. खरं तर, तिचा पती राज कुंद्राला १९ जुलै रोजी एका अश्लील चित्रपट प्रकरणात अटक करण्यात आली होती. या प्रकरणात तो दोन महिने तुरुंगात होता. मात्र, आता तो जामिनावर बाहेर आला आहे.

वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं, तर शिल्पा शेट्टी शेवटची ‘हंगामा २’ चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात शिल्पासह परेश रावल, मीझान आणि प्रणिता सुभाष मुख्य भूमिकेत होते. अभिनेत्रीचा हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला. त्याचबरोबर आता ती ‘निकम्मा’ चित्रपटात दिसणार आहे. यासोबतच ती टेलिव्हिजनवरील काही रियॅलिटी शोमध्ये परीक्षक म्हणूनही दिसत आहे.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-महाअष्टमीचे निमित्य साधत अनुष्काने शेअर केला वामिकाचा फोटो, म्हणाली ‘रोज तुझ्यात…’
–‘या’ कलाकारांनी गुपचूप लग्न करत चाहत्यांना दिला आश्चर्याचा सुखद धक्का
–सैफ अली खानने तैमूरबद्दल केला खुलासा म्हणाला, ‘जेहच्या जन्मानंतर तैमूर अधिक…’










