Tuesday, December 24, 2024
[aioseo_breadcrumbs]

बाजीगर सिनेमातील पहिल्या सीनच्या शुटवेळी भीतीने कापत होती शिल्पा शेट्टी, तेव्हा शाहरुखने दिला होता ‘हा’ सल्ला

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीने नुकताच तिचा 48 वा वाढदिवस साजरा केला. शिल्पाने तिच्या अभिनयाच्या आणि डान्सच्या जोरावर बॉलिवूडमध्ये आपले पक्के स्थान निर्माण केले. फिटनेस ही शिल्पाची एक वेगळी ओळख आहे. तब्बल 25 वर्षांपेक्षा अधिक काळ बॉलिवूडमध्ये घालवणाऱ्या शिल्पाने शाहरुख खान आणि काजोल यांच्यासोबत ‘बाजीगर‘ या सिनेमातून पदार्पण केले. या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यानचा एक किस्सा चांगलाच गाजलेला आहे. या सिनेमाच्या शूटिंगच्या वेळी जेव्हा शिल्पाने पहिल्यांदा कॅमेरा फेस केला तेव्हा ती खूपच नर्वस झाली होती. त्यावेळी तिला शाहरुख खानने खूपच मदत केली होती.

शिल्पा (shilpa shetty) हिने एका मुलाखतीमध्ये याबद्दल खुलासा केला होता. तिने सांगितले की, “1993 साली प्रदर्शित झालेल्या बाजीगर सिनेमातून मी बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली. तेव्हा मी केवळ 17 वर्षांची होती. मला चित्रपटांबद्दल जास्त माहिती नव्हती. मी पहिल्यांदा ‘ऐ मेरे हमसफर’ या गाण्यासाठी कॅमेरा फेस केला. शूट इगतपुरीमध्ये होते आणि 8 तापमान त्यात मी एक सलवार सूट घातला होता. थंडीने मी कपात होती. त्याकाळात अनेक मुलांना मी आवडायची मी कधीच कोणाला मिठी मारली नव्हती. मात्र, त्यात गाण्यात मला असे करायचे होते. मी खूपच नर्वस होती. सुदैवाने मला त्या गाण्यात घाबरायचे होते, त्यामुळे ते काम करून गेले.”

पुढे शिल्पा म्हणाली की, “मला लिप सिंक देखील येत नव्हते आणि मी माझ्या पहिल्या सीनसाठी कॅमेऱ्याकडे पाठ करून उभी होती. कोरिओग्राफर रेखा चिन्नी सतत कट कट ओरडत होती आणि मला सांगत होती की, माझ्या केसांमुळे शॉटमध्ये अडथळा येत आहे. नशिबाने तिथे शाहरुख होता. मला त्याने बाजूला नेले आणि सांगितले की, कॅमेरा आपले प्रेक्षक आहे. जर मी कॅमेऱ्याकडे पाठ करून उभी राहिली आणि चांगले एक्सप्रेशन दिले तरी कोणी पाहू शकणार नाही.” पुढे ती म्हणाली की, त्याचा हा सल्ला ती आजही पाळते.

शिल्पाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाल्यास तिचा ‘निक्कमा’ हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार असून, याशिवाय ती रोहित शेट्टीच्या ‘इंडियन पुलिस फोर्स’ या सिरीजमधून ओटीटीवर पदार्पण करणार आहे.(shilpa shetty recalled shah rukh khan in baazigar advice)

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
…म्हणून सोळाव्या वर्षी गरोदर असलेल्या डिंपल कपाडिया यांनी पहिल्याच चित्रपटानंतर घेतला होता चित्रपटसृष्टी सोडण्याचा निर्णय
रिलीजपूर्वी आदिपुरुषच्या टीमची मोठी घोषणा,’या’ खास कारणास्तव प्रत्येक थिएटरमध्ये एक जागा ठेवणार रिकामी

हे देखील वाचा