Friday, December 8, 2023

…म्हणून सोळाव्या वर्षी गरोदर असलेल्या डिंपल कपाडिया यांनी पहिल्याच चित्रपटानंतर घेतला होता चित्रपटसृष्टी सोडण्याचा निर्णय

बॉलिवूडमध्ये अशा खूप कमी अभिनेत्री आहेत, ज्या केवळ एका चित्रपटाने हिट झाल्या आहेत. यात नाव येत ते म्हणजे अभिनेत्री डिंपल कपाडिया. डिंपल कपाडिया यांनी वयाच्या 16 व्या वर्षी सुपरहिट चित्रपट केला होता. त्या रातोरात प्रसिद्ध झाल्या होत्या. पण डिंपल या पहिल्या अशी अभिनेत्री असतील, ज्यांनी एक चित्रपट करून चित्रपटसृष्टी सोडण्याचा निर्णय घेतला होता. त्यांच्या आयुष्यात रोमान्स, एमोशन, प्रेम या सगळ्या गोष्टी होत्या. बॉबी हा चित्रपट मिळण्याआधी त्यांचे आयुष्य अगदी सामान्य माणसासारखे होते. परंतु या एका चित्रपटाने त्यांचे आयुष्य बदलून टाकले होते. या चित्रपटादरम्यान त्या राजेश खन्ना यांच्यावर प्रेम करू लागल्या होत्या. गुरुवारी (8 जून)ला डिंपल आपला 66वा वाढदिवस साजरा करत आहेत. त्यांचा जन्म 8 जून, 1957 रोजी मुंबईत झाला होता. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी चित्रपटसृष्टी सोडण्याचा निर्णय का घेतला, याबद्दल जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया…

डिंपल कपाडिया (dimple kapadia) या दिसायला खूप सुंदर होत्या. हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच त्यांच्या सौंदर्याच्या चर्चा सर्वत्र पसरल्या होत्या. राजेश खन्ना जेव्हा त्यांना भेटले तेव्हा पहिल्या भेटीतच त्यांना डिंपल या खूप आवडल्या होत्या. त्या वेळेस राजेश खन्ना खूप मोठे सुपरस्टार होते. हजारो मुली त्यांच्यावर प्रेम करत होत्या. पण पहिल्याच नजरेत त्यांना डिंपल आवडल्या होत्या. त्यावेळी कोणताही वेळ न लावता त्यांनी डिंपल यांना लग्नासाठी मागणी घातली. यावेळी डिंपल या त्यांच्या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त होत्या. त्यांना देखील राजेश खन्ना खूप आवडत होते. त्यामुळे त्यांनी लगेच राजेश खन्ना यांना लग्नासाठी होकार सांगितला. डिंपल यांचा पहिला चित्रपट प्रदर्शित होण्याच्या आधीच त्या दोघांनी लग्न केले.

डिंपल कपाडिया यांचा ‘बॉबी’ हा चित्रपट 28 सप्टेंबर, 1973 रोजी प्रदर्शित झाला. याआधीच मार्चमध्ये डिंपल आणि राजेश खन्ना यांनी लग्न केले होते. त्यावेळी डिंपल या केवळ 16 वर्षांच्या होत्या. त्यांचे लग्न झाल्यानंतर काही दिवसातच डिंपल या प्रेग्नेंट असल्याच्या बातम्या सर्वत्र पसरू लागल्या. त्यावेळी त्यांचे बेबी बंप देखील दिसायला लागले होते.

डिंपल यांचा पहिला ‘बॉबी’ हा चित्रपट खूप सुपरहिट झाला. या चित्रपटात ऋषी कपूर हे मुख्य भूमिकेत होते. डिंपल यांचा चित्रपट रिलीज होण्याआधी त्यांचे लग्न आणि प्रेग्नंंसीमुळे कुटुंबामध्ये खूप नाराजी होती. त्यांनी केलेल्या या पहिल्या चित्रपटानंतर त्यांनी चित्रपटसृष्टी सोडून जाण्याचा निर्णय घेतला. पण काही वर्षांनंतर डिंपल आणि राजेश खन्ना यांच्यातील वादाच्या बातम्या समोर आल्या. त्यावेळी माध्यमात प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, डिंपल यांना पुन्हा चित्रपटात काम करण्याची इच्छा होती, पण राजेश खन्ना ही गोष्ट मान्य नव्हते. त्यामुळे त्यांच्यात वाद होत असे. शेवटी त्यांनी सगळी बंधने धुडकावून चित्रपटात प्रवेश केला आणि घटस्फोट न घेताच राजेश खन्नापासून लांब राहू लागल्या. (birthday special story about dimple kapadia)

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
दर रविवारी बिग बी अनवाणी पायांनी चाहत्यांचे का करतात अभिवादन? स्वतःच सांगितले कारण

लग्नाशिवाय दुसऱ्यांदा आई हाेणार ‘ही’ अभिनेत्री, युजर्सेने ट्राेल केल्यावर रामपालच्या प्रेयसीने दिले चाेख उत्तर

हे देखील वाचा