कोरोना काळात सगळेच आरोग्याची खूप काळजी घेत आहेत. कोरोनाचा प्रसार खूप वेगाने वाढत असल्याने अनेकांचे जीव जाताना दिसत आहे. यातच सगळेजण त्यांच्या परीने काळजी घेत आहेत. बॉलिवूडमधील अनेक कलाकार या कोरोनाच्या कचाट्यात सापडले आहेत. त्यामुळे आता खूप खबरदारी घेऊन सगळेजण वागत आहे. याचे ताजे उदाहरण म्हणजे बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी. काही दिवसांपूर्वी तिने तिच्या संपूर्ण कुटुंबाला कोरोनाची लागण झाल्याची बातमी सोशल मीडियावर दिली होती. तिने सांगितले होते की, ती सोडून घरात सर्वांना कोरोनाची लागण झाली आहे. नुकताच तिने सोशल मीडियावर तिचे पती राज कुंद्रा यांच्या सोबत एक फोटो पोस्ट केला आहे.
शिल्पा शेट्टीने हा फोटो तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंट वरून शेअर केला आहे. या सोबत तिने पुन्हा एकदा सर्वांना सांगितले आहे की, या संकटातून बाहेर पडायचे असेल तर सकारात्मक दृष्टिकोन असणे खूप गरजेचे आहे.
तिने शेअर केलेल्या या फोटोमध्ये पाहू शकता की, तिने दोन मास्क लावले आहेत. या फोटोमध्ये दोघेही आरशात पाहत आहेत. शिल्पा शेट्टी राज कुंद्रा यांना खूप प्रेमाने पाहत आहे. हा फोटो शेअर करून अभिनेत्रीने कॅप्शन दिले आहे की,” कोरोना काळातील प्रेम, कोरोना प्रेम आहे.” या सोबतच तिने पुढे लिहिले आहे की,” तुम्ही दिलेल्या शुभेच्छा आणि आशीर्वादासाठी खूप धन्यवाद.”
शिल्पा शेट्टीने शेअर केलेल्या या फोटोवर तिच्या अनेक चाहत्यांसोबत अनेक कलाकार देखील कमेंट करून तिच्या कुटुंबाला लवकरात लवकर बरे होण्याच्या शुभेच्छा देत आहेत.
शिल्पा शेट्टीच्या घरात सर्वांना कोरोनाची लागण झाली आहे. यात तिचे घरातील दोन नोकर, सासू सासरे, आई, मुलगा वियान , मुलगी समीक्षा आणि तिचे पती राज कुंद्रा यांना कोरोनाची लागण झाली आहे. या गोष्टीची माहिती स्वतः शिल्पाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंट वरून दिली होती.
बॉलिवूड मधील अनेक कलाकारांना आतापर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. यात कार्तिक आर्यन, भूमी पेडणेकर, अक्षय कुमार, कॅटरीना कैफ, विकी कौशल यांना कोरोना झाला होता. पण आता ते सगळे कोरोनावर मात करून एकदम ठीक आहेत.
हेही वाचा-










