Friday, April 17, 2026
Home बॉलीवूड ‘सीटी मार’ गाण्यावर धमाकेदार डान्स करताना दिसली डॉक्टरांची टीम; व्हिडिओ पाहून दिशा पटानीनेही केले कौतुक!

‘सीटी मार’ गाण्यावर धमाकेदार डान्स करताना दिसली डॉक्टरांची टीम; व्हिडिओ पाहून दिशा पटानीनेही केले कौतुक!

कोरोना व्हायरसमुळे आजकाल संपूर्ण देशात हाहाकार माजला आहे. चहूबाजूंनी मनाला चटका लावणाऱ्या बातम्या समोर येत आहेत. रुग्णालयांमध्ये बेडची कमतरता आहे, तर बऱ्याच ठिकाणी ऑक्सिजनची कमतरता आहे. अशा परिस्थितीत, आजकाल आरोग्य विभागाच्या कर्मचार्‍यांवर जास्त ताण आहे. आरोग्य विभागातील डॉक्टर, परिचारिका व इतर कर्मचारी आपल्या क्षमतेने कर्तव्य पार पाडत आहेत. दरम्यान, एक व्हिडिओ समोर आला आहे, जो पाहून तुम्हीही खूप खुश व्हाल. हा व्हिडिओ डॉक्टरांचा आहे, ज्यामध्ये ते सलमान खानच्या ‘राधे: योर मोस्ट वाॅंटेड भाई’  चित्रपटातील ‘सीटी मार’ या गाण्यावर नाचताना दिसत आहेत.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ दिशा पटानीच्या एका फॅन पेजने शेअर केला आहे. ज्यात डॉक्टर अप्रतिम स्टाईलमध्ये नाचताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये, डॉक्टरांची एक टीम रूग्णालयाच्या व्हरांड्यात आणि रूग्णालयामधील वेगवेगळ्या ठिकाणी ‘सीटी मार’ गाण्यावर नाचत आहे. यावेळी, सर्व डॉक्टरांनी मास्क घालून डान्स केला आहे.

‘राधे: योर मोस्ट वाॅंटेड भाई’ या चित्रपटाची अभिनेत्री दिशा पटानीनेही यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. अभिनेत्रीने हा व्हिडिओ तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये शेअर केला आहे. यासह तिने डॉक्टरांच्या उत्साहाचे कौतुकही केले आहे. व्हिडिओ शेअर करताना, अभिनेत्रीने डॉक्टरांना ‘रिअल लाईफ हिरो’ म्हटले आहे.

दिशाने व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “वाह! आपले खरे हिरो.” आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या प्रतिकूल परिस्थितीतही, डॉक्टरांनी हिंमत कायम ठेवल्याबद्दल, नेटकरीही डॉक्टरांच्या टीमचे कौतुक करत आहेत. तसेच सलमान खान आणि दिशा पटानी यांच्या चित्रपटाच्या या गाण्याला लूलिया वंतूर आणि कमाल खान यांनी आवाज दिला आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-ओहो… नाचा रे! जेव्हा शाहरुख खान आणि थालापती विजय एकत्र करतात डान्स, व्हिडिओ पाहून तुमचेही थिरकतील पाय

-काय सांगता! हॉलिवूडमध्ये जाण्यास राखी सावंत सज्ज, ट्रान्सफॉर्मेशन पाहून चाहत्यांनी पाडला कमेंटचा पाऊस

-डीप नेक बोल्ड ब्लॅक ड्रेसमध्ये उर्वशी रौतेलाच्या जीवघेण्या अदा! पाहून तुम्हीही व्हाल घायाळ

हे देखील वाचा