Saturday, August 2, 2025
Home बॉलीवूड शेतातील ताज्या भाज्या पाहून उत्साहित झाली शिल्पा शेट्टी, शेअर केला व्हिडिओ

शेतातील ताज्या भाज्या पाहून उत्साहित झाली शिल्पा शेट्टी, शेअर केला व्हिडिओ

बॉलिवूड प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टीची स्टाईल खूप वेगळी आहे. सोशल मीडियावर ती जबरदस्त चर्चेत असते. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तसेच आपल्या चाहत्यांसाठी नवनवीन पोस्ट शेअर करत असते. टेलिव्हिजन शो असो, चित्रपट किंवा सोशल मीडिया ती तिचे जलवे दाखवताना दिसते. तसेच तिचे योगा व्हिडिओ, डान्स करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होताना दिसत असतात. यावेळी शिल्पाने एक वेगळाच व्हिडिओ शेअर केला आहे. तिचा हा व्हिडिओ तिने शेतात शूट केला असून, त्यामध्ये ती ताज्या भाज्यांचा आनंद घेताना दिसत आहे.

अलीकडेच तिने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवरून व्हिडिओ पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ पोस्ट करताना तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘थेट शेतातून.. ज्या अन्नाचे कोणी नुकसान करत नाही’. या व्हिडिओवर तिचे चाहते भरपूर कमेंट करत आहे. एका चाहत्याने लिहिले ‘ अमेझिंग’, तर दुसऱ्या एकाने लिहिले की, “खूप सुंदर.” हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप वेगाने व्हायरल होत आहे.

शिल्पाने मध्यंतरी एक व्हिडिओ शेअर केला होता, ज्यात तिचा एक नवीनच हेअर कट सर्वांना दिसला. तिने तिचा हेअर कट करतानाच व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. चाहत्यांनी त्यावर खूप मजेदार कंमेंट देखील दिल्या होत्या. मात्र तिने हा न्यू हेअर कट का केला? हा प्रश्न सर्वांनाच पडला होता. यावर असे बोलले जात आहे की, जेव्हा तिचा पती हा अश्लील व्हिडिओ प्रकरणामध्ये जेलमध्ये गेला होता, तेव्हा त्याला सुटका मिळावी म्हणून तिने देवाकडे अशी प्रार्थना केली होती की, जर तो सुटला तर ती तिचे थोडे केस दान करेल. तिच्या पतीची सुटका झाली आणि तिने तिचे केस कापून दान केले.

शिल्पा शेट्टीच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, ती अलीकडेच हंगामा २ मध्ये दिसली. खूप वर्षानंतर ती पडद्यावर परतली होती. ती लवकरच ‘निक्कामा’ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात ती भाग्यश्रीचा मुलगा अभिमन्यू दासनी आणि शर्ले सेतिया सोबत मुख्य भूमिका निभावताना दिसणार आहे. ती चित्रपटात येण्यापूर्वी तिने मॉडलिंग देखील केले होते. तसेच शिल्पाचे स्वतः चे योगा ऍप आहे. यासोबत तिचा यूट्यूब चॅनल आहे. त्यावर ती वेग वेगळ्या डिश बनवून आणि योगासने करून दाखवत असते. तिच्या चॅनेलला २.८२ मिलियन सबस्क्राईबर आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-चाहत्यांच्या मनावर राज्य करणाऱ्या पुनीतने बालपणीही गाजवलीय सिनेसृष्टी; दोन ‘राष्ट्रीय पुरस्कार’ केले होते नावावर

-मोठी बातमी! सुपरस्टार पुनीत राजकुमारच्या निधनामुळे कर्नाटकात दु:खी चाहते उतरले रस्त्यावर, कलम १४४ लागू

-‘पावरस्टार’ पुनीतच्या निधनाने हळहळली सिनेसृष्टी; चिरंजीवी ते नागार्जुन, ‘या’ कलाकारांनी व्यक्त केले दु:ख

हे देखील वाचा