बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीसाठी 2021 हे वर्ष अत्यंत अडचणींचे ठरले आहे. अश्लील चित्रफित प्रकरणी पती राज कुंद्राच्या अटकेनंतर शिल्पा शेट्टीला मोठ्या प्रमाणावर ट्रोल करण्यात आले होते. या संपूर्ण प्रकरणाचा शिल्पाला वैयक्तिक तसेच खासगी आयुष्यात ही अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. 2 महिन्यांनंतर राज कुंद्राची कारागृहामधून सुटका करण्यात आली आहे. मात्र, शिल्पा शेट्टी अजूनही नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आहे.
अलीकडेच शिल्पा शेट्टी ‘सुपर डान्सर 4’ या कार्यक्रमात दिसून आली होती. यावेळी तिने हसत हसत पोझ देत फोटो सुद्धा काढले होते. शिल्पाच्या या अदांमुळे चाहत्यांनी तिचे कौतुकही केले आहे. त्याचवेळी अनेकांनी तिच्या या फोटोशूटला नापसंती दर्शविली आहे. नेटकऱ्यांनी लगेच तिला राज कुंद्राच्या अश्लील चित्रफित प्रकरणाची आठवण करून दिली आहे. बॉलिवूड अभिनेत्रींवर त्यांच्या पतीमुळे टीका होण्याची ही पहिली वेळ नाही. राज कुंद्राच्या अटकेनंतरच अशा टीकांना सुरुवात झाली होती.
या संबंधी समोर आलेल्या व्हिडिओमध्ये, शिल्पाने पांढर्या रंगाची साडी परिधान केली आहे, ज्यामध्ये ती खूपच मनमोहक दिसत आहे. शिल्पा ‘सुपर डान्सर 4’ च्या मंचावर दिसून येत आहे. शिल्पा शेट्टीच्या या व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना एका युजरने “पतीची सुटका होताच, वागणूकच बदलली,” असे लिहिले आहे. त्याचबरोबर आणखी एका युजरने “आता पती आल्यामुळे पुन्हा स्टाइलमध्ये दिसायला लागली, नाहीतर कॅमेऱ्यासमोर तोंड सुद्धा दाखवत नव्हती, आता काय झाले, आधी तर सगळया माध्यमांवर केस करायला निघाली होती, लगेच इतकी दयाळू कशी झालीस, नकली बाई,” अशा प्रकारची तिखट प्रतिक्रिया दिली आहे.
दरम्यान ‘सुपर डान्सर 4’ या कार्यक्रमाची अंतिम फेरी जवळ आली असून यावेळी सहभागी स्पर्धकांसह कार्यक्रमाचे परीक्षकसुद्धा विशेष नृत्य सादर करून प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहेत.
कार्यक्रमाच्या तीन परीक्षकांमधून शिल्पा शेट्टी सुद्धा नृत्य सादर करताना दिसून येणार आहे. ज्याची झलक नुकतीच चॅनेलकडून टीव्हीवर दाखविण्यात आली आहे.
अश्लील चित्रफित प्रकरणामुळे शिल्पाला बराच काळ कार्यक्रमापासून लांब राहाव लागले होते. या कार्यक्रमात शिल्पा शेट्टीसह अनुराग बसू आणि गीता कपूर सुद्धा प्रशिक्षकांच्या भूमिकेत आहेत.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-अभिनेते अनुपम खेर यांनी हिंदू धर्माबद्दल केले मोठे वक्तव्य; म्हणाले, ‘हिंदू असणे हे जीवन…’
-मोठी घडामोड! एकीकडे जामीन अर्जावर सुनावणी सुरु असतानाच आर्यन खानची आर्थर रोड कारागृहात रवानगी
-आर्यनचे वकील मानेशिंदेंचे मोठे वक्तव्य; म्हणाले, आर्यनला ‘ग्लॅमरचा तडका’ लावण्यासाठी…










