बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती राज कुंद्रा हा मागील अनेक दिवस वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. त्याला अश्लील चित्रपटांची निर्मिती करून ते ऑनलाईन ऍपद्वारे प्रदर्शित केल्याच्या आरोपाखाली अटक केली होती. अनेक दिवस तो तुरुंगात होता. या नंतर त्याच्यावर अनेक प्रश्नचिन्ह उभे राहिले होते. एवढंच काय तर शिल्पा शेट्टीला देखील अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले होते. या काळात तिने काही दिवस तिच्या कामामधून ब्रेक घेतला होता तसेच ती सोशल मीडियापासून देखील दूर होती. यावेळी तिला आणि राज कुंद्राला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल केले होते.
नुकतेच अशी माहिती समोर आली आहे की, या प्रकरणानंतर राज कुंद्राने त्याचे ट्विटर आणि इंस्टाग्राम अकाऊंट बंद केले आहेत. सोशल मीडियावर तो मोठ्या प्रमाणात सक्रिय असायचा. या प्रकरणात जवळपास २ महिने तो तुरुंगात होता. बाहेर आल्यानंतर त्याने सोशल मीडियाशी सगळा संपर्क तोडला होता. परंतु आता त्याने त्याचे अकाऊंट बंद केले आहेत. या प्रकरणातून बाहेर आल्यानंतर तो सार्वजनिक ठिकाणी देखील जात नसत. तो अगदी एकाकी आयुष्य जगत आहे. त्यात सोशल मीडिया ट्रोलिंगला कंटाळून त्याने हा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. (Shilpa Shetty’s husband raj Kundra delet his tweeter and Instagram account after pronography case)

राज कुंद्रा याने अश्लील चित्रपट बनवून ते ऑनलाईन ऍपवर दाखवल्या प्रकरणी त्याला अटक केली होते. क्राईम ब्रॅंचच्या माहितीनुसार, राज कुंद्राने त्याच्या या बिझनेसमध्ये १० कोटी रुपये गुंतवले होते. खरंतर फेब्रुवारी महिन्यातच या गोष्टीची माहिती मिळाली होती की, राज कुंद्राच्या कंपनीचा या सगळ्यांशी काहीतरी संबंध आहे. पण तसा ठोस पुरावा मिळाल्यानंतर त्याला अटक करण्यात आले होते.
फेब्रुवारी २०२१ मध्ये केलेल्या तपासावरून हे समोर आले होते की, राज कुंद्राची कंपनी काही छोट्या कलाकारांना वेबसीरिजमध्ये तसेच शॉर्ट फिल्ममध्ये काम करण्यासाठी लालच दाखवत होते. त्यानंतर त्यांच्याकडून ऑडिशनच्या नावाखाली काही शॉट्स करून घेतले जात होते. यामध्ये ते कलाकारांना तुम्हाला थोडा बोल्ड सीन करावा लागेल असे सांगायचे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-राज कुंद्रा अन् शिल्पा शेट्टीचा सुरूये वाद? पतीशिवाय अभिनेत्री गेली कौटुंबिक ट्रिपला










