Monday, February 24, 2025
Home बॉलीवूड शिल्पा शेट्टीच्या आईने पोलीस ठाण्यात नोंदवली तक्रार; फसवणुक केल्याचा लावलाय आरोप

शिल्पा शेट्टीच्या आईने पोलीस ठाण्यात नोंदवली तक्रार; फसवणुक केल्याचा लावलाय आरोप

शिल्पा शेट्टी सध्या राज कुंद्राला अश्लील सिनेमांच्या निर्मिती झालेल्या अटकेमुळे खूपच चर्चेत आली आहे. रोज या प्रकरणात नवनवीन गोष्टी पुढे येत आहे. त्यामुळे शिल्पा शेट्टीच्या डोक्यावरील टेन्शन काही केल्या कमी व्हायचे नाव घेत नाही. उलट रोज तिच्या टेन्शनमध्ये अधिकच भर पडत आहे.

नुकतेच शिल्पा शेट्टीच्या आई सुनंदा शेट्टी यांनी पोलीस ठाण्यात एक फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे. सुनंदा यांना एका जमीन व्यवहारात झालेल्या फसवणुकीची ही तक्रार आहे. खोट्या कागदपत्रांच्या आधारे सुनंदा शेट्टी यांची फसवणूक झाल्याचे त्यांनी त्यांच्या तक्रारीमध्ये सांगितले आहे. (shilpa shettys mother sunanda shetty filed a police complaint)

सुनंदा यांनी दाखल केलेल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे की, २०१९ ते फेब्रुवारी २०२० दरम्यान एका व्यक्तीसोबत त्यांनी कर्जतमध्ये जमीन खरेदीचा व्यवहार केला होता. त्यावेळी त्या व्यक्तीने सदर जमीन त्याच्या नावावर असल्याचे खोटे सांगत, सर्व खोटे कागदपत्र दाखवून सुनंदा शेट्टी यांना ती जमीन तब्बल १ कोटी ६० लाख रुपयांना विकली.

मात्र काही दिवसांनी सुनंदा यांना यासर्व प्रकाराबाबतची माहिती मिळाली. त्यांनी त्या जमिनीच्या खोट्या मालकाला याबाबत विचारले असता, त्याने तो व्यक्तीने एका राजकीय पक्षाच्या नेत्याच्या खूप जवळचा आणि खास असल्याचे सांगत सुनंदा यांना कोर्टात जाण्याचा सल्ला दिला. पुढे सुनंदा यांनी कोर्टाच्या आदेशानंतर पोलिसात ही तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीमध्ये त्यांनी कर्जतमध्ये जमीन व्यवहारात खोट्या कागदपत्रांच्या आधारे त्यांची फसवणूक करत त्यांना जमीन विकल्याचा आरोप केला आहे.

तत्पूर्वी सुनंदा यांचे जावई असणाऱ्या आणि पोर्नोग्राफी प्रकरणात अटकेत असलेल्या राज कुंद्राला अद्याप दिलासा मिळालेला नाही. मुंबईच्या कोर्टाने राज कुंद्रा आणि त्याचा सहकारी रायन थारप यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे. न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-एकेकाळी संजय दत्तवर प्रेम करायची माधुरी दीक्षित; मात्र अभिनेता जेल गेल्यानंतर बदललं सर्वकाही; असा होता ‘संजुबाबा’चा प्रवास

-अभिनेता ते साधूपर्यंत किस करण्यामुळे वादात राहिलीय शिल्पा शेट्टी; कोर्टाने जारी केला होता वॉरंट

-गौरीला ‘शक्ती : द पॉवर’मध्ये नव्हती आवडली शाहरुखची ओव्हर ऍक्टिंग; म्हणाली ‘सगळ्यात’ वाईट चित्रपट

हे देखील वाचा