कॉमेडी टीव्ही मालिका ‘भाभी जी घर पर हैं‘ (Bhabhi Ji Ghar Par Hai) २०१५ पासून प्रसारित होत आहे. इतक्या वर्षांत या टीव्ही मालिकेने अनेक चढउतार पाहिले. या टीव्ही मालिकेमध्ये एकापेक्षा एक मजेशीर किस्से पाहायला मिळतात, तर या मालिकेत दिसणारे पात्रही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत. मात्र, आज आम्ही तुम्हाला या टीव्ही मालिकेमध्ये ‘अंगूरी भाभी’च्या भूमिकेत दिसणारी अभिनेत्री शिल्पा शिंदेबद्दल (Shilpa Shinde) सांगणार आहोत.
खरं तर, शिल्पा या टीव्ही मालिकेची पहिली अंगूरी भाभी होती. तिच्या जबरदस्त अभिनयाने आणि कॉमिक टायमिंगने तिने प्रेक्षकांच्या हृदयात खास स्थान निर्माण केले. मात्र, फी वाढवण्यावरून निर्मात्यांशी झालेल्या वादानंतर, शिल्पाने ही मालिका सोडली. बातम्यांनुसार, शिल्पाचे मालिकेच्या निर्मात्यांसोबत बरेच भांडण झाले होते. (shilpa shinde opened up about bonding with bhabi ji ghar par hain co actress saumya tandon)
मात्र, या मालिकेत ‘गोरी मेम’ची भूमिका साकारणाऱ्या सौम्या टंडननेही (Saumya Tandon) पाच वर्षांनंतर ही टीव्ही मालिका सोडली. सौम्याला याचे कारण विचारण्यात आले तेव्हा अभिनेत्रीने सांगितले की, तिला सतत एकच भूमिका करण्याचा कंटाळा आला होता, म्हणून तिने मालिका सोडली.
सौम्या टंडनने ‘भाभी जी घर पर हैं’ सोडल्यानंतर, जेव्हा जुनी अंगूरी भाभी म्हणजेच शिल्पा शिंदेकडून प्रतिक्रिया घेतली गेली, तेव्हा ती म्हणाली, “माझी सौम्याशी कधीही जवळचे नाते नव्हते. फक्त एवढेच नाही, तर आसिफ वगळता या मालिकेतील कोणत्याही अभिनेत्याशी माझे जास्त बोलणे नव्हते. शो सोडल्यानंतरही मी असिफशी बोलले नाही.”
दरम्यान या मालिकेमध्ये नुकतेच अनिता भाभीची जागा तिसऱ्यांदा बदलण्यात आली आहे. आता विदिशा श्रीवास्तव अनिता भाभीच्या भूमिकेत दिसत आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा