×

साखरपुडा झाला असताना शिल्पा शिंदेने का मोडले ऐन वेळेस लग्न, स्वतः मुलाखतीत केला खुलासा

अभिनेत्री शिल्पा शिंदे (shilpa shinde)केवळ तिच्या उत्कृष्ट अभिनयासाठीच नाही तर तिच्या वैयक्तिक आयुष्यासाठीही ओळखली जाते. कॉमेडी टीव्ही सीरियल ‘भाबी जी घर पर हैं’मध्ये शिल्पा ‘अंगूरी भाभी’च्या भूमिकेत दिसली होती. या मालिकेमुळे शिल्पाला घरोघरी प्रसिद्धी मिळाली. एवढेच नाही तर ‘बिग बॉस ११’ चे विजेतेपद पटकावल्यानंतरही शिल्पा चर्चेत आली आहे. मात्र, आज आम्‍ही तुम्‍हाला शिल्पा शिंदेच्‍या पर्सनल लाइफबद्दल सांगणार आहोत आणि जाणून घेऊया की, शिल्पा लग्न का करू शकली नाही?

अभिनेत्री शिल्पाने २००९ मध्ये टीव्ही अभिनेता रोमित राजसोबत एंगेजमेंट केली होती, लग्नही होणार होते. मात्र, शिल्पाने लग्नाच्या काही दिवस आधी सगाई तोडली. माध्यमातील वृत्तानुसार, शिल्पाच्या जवळच्या मैत्रिणींनी तिला समजावून सांगितले होते की लग्न करण्यासाठी हे योग्य वय आहे पण अभिनेत्री सहमत नव्हती.

स्वत: शिल्पा शिंदेने एका मुलाखतीत सांगितले होते की, ‘रोमित आणि माझी खूप पूर्वी एंगेजमेंट झाली होती आणि त्यावेळी आम्ही तरुण होतो. मात्र, त्यावेळी मला लग्न करून सेटल व्हायचे नव्हते, मला करिअरमध्ये पुढे जायचे होते. यानंतर रोमित आणि मी वेगळे झालो.

माध्यमातील वृत्तानुसार, रोमितपासून वेगळे झाल्यानंतर शिल्पाच्या आयुष्यात एका व्यक्तीची एंट्री झाली होती पण इथेही काही करता आले नाही. असे म्हटले जाते की यानंतर शिल्पाने सिंगल राहणे चांगले मानले आणि तिच्या करिअरवर लक्ष केंद्रित केले.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

Latest Post