दीपेश भानच्या आठवणीत भावूक झाली शिल्पा शिंदे; म्हणाली, ‘तो चांगला माणूस होता, पण…’

‘भाबी जी घर पर है’चा प्रसिद्ध स्टार दीपेश भान (Deepesh Bhan) आता या जगात नाही. त्याच्या निधनाच्या दु:खातून त्याचे चाहते आणि सहकलाकार अजूनही सावरू शकलेले नाहीत. दीपेशचे सहकलाकार त्यांच्या इंस्टाग्रामवर त्याच्यासोबत घालवलेले क्षण शेअर करून त्याची आठवण काढत आहेत. आता यादरम्यान, शोमधील जुनी ‘अंगूरी भाभी’ म्हणजेच शिल्पा शिंदेलाही (Shilpa Shinde) दीपेशची आठवण येत आहे. शिल्पा म्हणते, दीपेश एक चांगला माणूस होता, आशा आहे की तो चांगल्या ठिकाणी असेल.

टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना शिल्पा म्हणाली, “तो खूप चांगला माणूस होता. जेव्हा मी सेटवर असायचे, तेव्हा आम्ही नेहमीच खूप मजा करायचो. परंतु २०१६ मध्ये शो सोडल्यानंतर मी त्यांच्याशिवाय कोणाच्याही संपर्कात नव्हते. मी दिपेशला एकदा फोन केला होता, पण त्याने फोन उचलला नाही. अलीकडेच मला या शोमध्ये टिकाची भुमिका साकारणाऱ्या वैभव माथूरकडून समजले की, दिपेश माझ्याबद्दल बोलत असे. मला अजूनही आठवतं, तो मला सेटवर भाभीजी म्हणायचे.” (shilpa shinde react on deepesh bhan death)

ती पुढे म्हणाली, “दीपेशने वैभवला सांगितले की, त्याला त्यावेळी माझा फोन उचलता आला नाही, याचे वाईट वाटले. पण मला समजले की, त्यावेळी संपूर्ण टीम काही कारणांमुळे माझ्यापासून अंतर ठेवत होती. त्यामुळेच कोणी माझ्याशी बोलले नाही. म्हणूनच दीपेशने माझाही फोन उचलला नाही. पण मला आशा आहे की, तो आता चांगल्या ठिकाणी आहे.”

काही दिवसांपूर्वी क्रिकेट खेळताना दिपेश अचानक पडला होता. रुग्णालयात नेले असता त्यांचे निधन झाल्याचे समजले. दीपेशच्या मृत्यूचे कारण ब्रेन हॅमरेज असल्याचे सांगण्यात आले.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा

Latest Post