कोव्हिड-१९ चा भारतात शिरकाव झाला आणि हळूहळू संपूर्ण देशामध्येच त्याचा फैलाव झाला. हा फैलाव इतक्या मोठ्या प्रमाणात झाला की कोरोना रुग्णसंख्येत भारत जगामध्ये दुसरा आला.
गेल्या वर्षी अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींना कोरोनाची लागण झाली होती. परंतु हे सेलिब्रिटी लस उपलब्ध नसल्याने १४ दिवस विलगीकरणात राहिले आणि डॉक्टरांच्या उपचारांनी बरे देखील झाले. परंतु, अशी एक अभिनेत्री आहे जिने कोव्हिड नसतानाही स्वतःचं लसीकरण करून घेतलं. कोण आहे ही अभिनेत्री चला पाहुयात.
हम, गोपी किशन, आंखे, बेवफा सनम, खुदा साक्षी यासारख्या हिट चित्रपटांमधून आपली प्रतिभा दाखवणारी अभिनेत्री शिल्पा शिरोडकर बरीच वर्षे मोठ्या पडद्यावरुन गायब होती. मात्र, गेल्या काही काळापासून शिल्पा सोशल मीडियावर खूप अॅक्टिव आहे.
नुकतंच तिने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे जो जोरदार व्हायरल होत आहे. याचं कारण शिल्पाने नुकतंच कोरोना व्हायरसवरील उपलब्ध लसीचं स्वतःवर लसीकरण करून घेतलं आहे. तिने तिचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे शिल्पा ही लसीकरण करून घेणारी पहिली भारतीय अभिनेत्री ठरली आहे.
व्हायरल होत असलेल्या शिल्पाच्या फोटोत तिच्या चेहऱ्यावर मास्क असून तिच्या हातावर एक छोटी पट्टी बांधली आहे. हा फोटो सामायिक करताना तिने लिहिलं आहे की, “लसीकरण आणि सुरक्षित …. हे न्यु नॉर्मल आहे …. २०२१ मी येत आहे.” आता शिल्पाचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. आपल्याला ठाऊक आहे का की शिल्पाशिवाय इतर कोणत्याही भारतीय अभिनेत्रीने अद्यापही स्वतःच लसीकरण करून घेतलेलं नाही.
शिल्पा ही लग्नानंतर गेली अनेक वर्षे दुबईमध्ये वास्तव्यास आहे. तिथेच तिला ही लसीकरण करण्याची संधी मिळाली आहे. शिल्पाच्या करिअरबद्दल बोलायचं झालं तर तिने बर्याच हिट चित्रपटांमध्ये काम केलं होतं, पण त्यानंतर तिने रुपेरी पडद्यापासून अंतर ठेवणं पसंत केलं.
एका मुलाखतीत ती म्हणाली होती की,’साल २००० मध्ये लग्नानंतर माझे पती आणि मी पाच वर्षे लाँग डिस्टन्समध्ये राहिलो. मग मी दुबईला गेले. तिथे कुटुंबासोबत मी कायम आनंदात राहिले परंतु मी माझ्या कामाला देखील मिस करत होते.’
मात्र, आता शिल्पा लवकरच पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये कमबॅक करण्यास सज्ज झाली आहे. तिने स्वत: याबद्दल माहिती दिली आहे. चित्रपटांमधील कमबॅकविषयी शिल्पा म्हणाली, ‘माझ्या काळापासून ते आत्ताच्या काळातील सिनेमात अगणित बदल झाले आहेत. आता लोक अधिक व्यावसायिक झाले आहेत. मी माझ्या कारकीर्दीच्या अशा टप्प्यावर एक रोमँटिक मुख्य भूमिका साकारण्याचा विचारच करू शकत नाही.’
पुन्हा एकदा पडद्यावर आल्याचा आनंद झाल्याचे शिल्पाने सांगितले. शिल्पा चित्रपटांमध्ये कमबॅक करणार आहे, मात्र ती बर्याच वर्षांपासून सोशल मीडियावर अॅक्टिव्ह आहे. तिच्या चाहत्यांना तिचे फोटोज खूप आवडतात. आता शिल्पाने कोरोना लसीकरण करून तिच्या चाहत्यांना आणखी एक आश्चर्याचा धक्का दिला आहे. तिच्या या पोस्टवर चाहते आनंदी आहेत आणि त्यांच्या प्रतिक्रियांमधून ते व्यक्त होत असतात.