Saturday, June 29, 2024

‘लागीर झालं जी’ फेम शितली लवकरच झळकणार ‘या’ चित्रपटात, चाहत्यांना लागलीय उत्सुकता

झी मराठीवरील ‘लागीर झालं जी’ मालिका प्रचंड गाजली. या मालिकेने ग्रामीण भागात प्रत्येकालाच वेड लावले होते. यामध्ये सर्वात जास्त चर्चा झाली ती शितलीच्या भूमिकेची. आपल्या दमदार आणि अस्सल अभिनयाने अभिनेत्री शिवानी बावकरने (Shivani Baokar) ही भूमिका दमदारपणे साकारले होती. या मालिकेनेच तिला घराघरात लोकप्रियता मिळवून दिली. प्रेक्षकांनी तिच्या या भूमिकेचे आणि अभिनयाचे कौतुक केले होते. आता सर्वांची आवडती शितली लवकरच ‘गुल्हर’ चित्रपटातून रुपेरी पडद्यावर झळकणार आहे.

अभिनेत्री शिवानी बावकरने आपल्या दमदार अभिनयाने आणि घायाळ करणाऱ्या सौंदर्याने मराठी चित्रपट जगतात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. ती सोशल मीडियावरही नेहमी सक्रिय असते. यावरुन ती आपल्या चाहत्यांशी फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. लागिर झालं जी च्या यशानंतर आता ती लवकरचं ‘गुल्हर’ या मराठी चित्रपटात झळकणार आहे. ६ मे ला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून चित्रपटाचा पोस्टर नुकताच समोर आला आहे. ज्यामध्ये पावसात चिंब भिजलेली शिवानी सर्वांचेच लक्ष वेधले आहे.

या चित्रपटाचे दिग्दर्शन रमेश चौधरी यांनी केले असून त्यांची या चित्रपटात मूख्य भूमिकाही पाहायला मिळणार आहे. चित्रपटात रमेश चौधरी आणि शिवानी बावकरची केमिस्ट्री प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. चित्रपटाची कथा एका शाळकरी मुलावर आधारित आहे ज्यामध्ये लवस्टोरीही पाहायला मिळणार आहे. आयडियल व्हेंचरच्या बॅनरखाली निर्माते शांताराम मेदगे, शिवाजी भिंताडे, अनुप शिंदे, अबिद सय्यद यांनी ‘गुल्हर’ची निर्मिती केली आहे.मोहन पडवळ यांनी ‘गुल्हर’ची कथा लिहिली असून संजय नवगिरे यांनी पटकथा व संवादलेखन केलं आहे. आता शिवानीच्या चाहत्यांना तिच्या या दमदार भूमिकेची आणि चित्रपटाची उत्सुकता लागली आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा- 

हे देखील वाचा