Monday, June 17, 2024

‘केजीएफ २’ च्या शूटिंग दरम्यान असे काय झाले? की, संजय दत्त म्हणाला, ‘यश प्लिज माझा अपमान करू नकोस’

बहूप्रतिक्षीत चित्रपट ‘केजीएफ २‘ नुकतेच प्रदर्शित झाला आहे, जो पाहून ‘केजीएफ’चे चाहते वेडे झाले आहेत. काही दिवसांपूर्वी चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ज्यामध्ये यश (Yash) , संजय दत्त (Sanjay Dutt), रवीना टंडन (Ravina Tandon) आणि चित्रपट निर्माता करण जोहर (Karan Johar) उपस्थित होते. इव्हेंटमध्ये यशने संजय दत्त सेटवर कसे काम करायचे ते सांगितले. 

रॉकी भाई संजू बाबाचे कौतुक करताना म्हणाला, “या चित्रपटासाठी त्यांनी त्याच्या तब्येतीसह ज्याप्रकारे स्वत:ला वचनबद्ध केले, त्यावरून त्यांचे समर्पण दिसून येते. त्यांनी ऍक्शन सीक्वेन्ससाठी स्वत:ला कसे समर्पित केले, हे आपल्या सर्वांना माहीत आहे. मी त्यांच्यासाठी खूप घाबरलो होतो. मी सर्वांना काळजी घेण्यास सांगितले, पण नंतर ते माझ्याकडे आले आणि म्हणाले की, “यश, प्लीज माझा अपमान करू नकोस, मी करेन आणि मला हे करायचे आहे. मला माझे सर्वोत्तम द्यायचे आहे.” (yash reveals sanjay asked him not to insult him during kgf 2 shooting)

ज्यावेळी संजय दत्त ‘केजीएफ २’ चे शूटिंग करत होता, त्याच काळात तो कॅन्सरसारख्या गंभीर आजाराशीही झुंज देत होता. पण या काळातही अभिनेत्याने आपल्या चित्रपटांचे शूटिंग थांबवले नाही आणि पूर्ण समर्पण आणि मेहनतीने आपले काम पूर्ण केले. आपले बोलणे संपवून यश म्हणाला, “संजय सर तुम्ही खरच योद्धा आहात. ते खूप डाउन टू अर्थ आणि दयाळू आहेत, ते मला यश भाई म्हणतात.”

यशचा चित्रपट ‘केजीएफ’ २०१८ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाची लोकांमध्ये क्रेझ अशी आहे की, लोक या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाच्या रिलीजची तीन वर्षांपासून वाट पाहत आहेत. KGF Chapter 2 हिंदीसह कन्नड, तमिळ, तेलुगु आणि मल्याळम भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट यापूर्वी १६ जुलै २०२१ रोजी प्रदर्शित होणार होता, परंतु कोविडच्या पार्श्वभूमीवर चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली होती. आता हा चित्रपट १४ एप्रिलला प्रदर्शित झाला आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

हे देखील वाचा