Friday, December 27, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘नीले नीले अंबर पर चाँद जब आये…’ निळ्या साडीत खुललं शिवानी बावकरचं सौंदर्य

मराठीतील गाजलेल्या मालिकांबद्दल विषय निघाला, तर ‘लागीर झालं जी’ या मालिकेचं नाव येणार नाही, असं होऊच शकत नाही. या मालिकेने प्रेक्षकांना देशभक्तीच्या आड लपलेल्या प्रेमकथेचे दर्शन घडवून दिले. ‘आज्या’ आणि ‘शितली’ या मुख्य व्यक्तीरेखा प्रचंड गाजल्या. मालिका संपून बराच काळ लोटला असला तरीही, प्रेक्षकांच्या मनात अजूनही यातील पात्रं जिवंत आहेत. शितली म्हणजेच अभिनेत्री शिवानी बावकरची लोकप्रियता तर या मालिकेने शिगेला पोहचवली.

अभिनेत्री मालिकेत देसी अंदाजात झळकली होती. तिचा हा सोज्वळपणा प्रेक्षकांकडून खूप पसंत केला गेला. मात्र ती खऱ्या आयुष्यात खूपच ग्लॅमरस आहे. सतत तिचे नवनवीन लूकमधले फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. ऑनस्क्रीनप्रमाणे चाहते ऑफस्क्रीनही तिला भरभरून प्रेम देतात. नुकतेच अभिनेत्रीने पोस्ट केलेला फोटो आता मोठ्या प्रमाणात पसंत केला जात आहे.

शिवानीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक फोटो शेअर केला आहे, ज्यात ती अतिशय सुंदर दिसत आहे. सुंदर मेकअप आणि केस मोकळे सोडून ती फोटोसाठी पोझ देताना दिसली आहे. तुम्ही पाहू शकता की, अभिनेत्रीने निळ्या रंगाची साडी परिधान केली आहे. या साडीमध्ये शिवानीचं सौंदर्य खुललं आहे, असे म्हणणे चुकीचे ठरणार आहे. विशेष म्हणजे, तिने या लूक आणि साडीला साजेसं असं कॅप्शनही फोटोला दिलं आहे. (shivani baokar shared photo in saree with caption neele neele ambar par)

हा ग्लॅमरस फोटो शेअर करून तिने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, “नीले नीले अंबर पर चाँद जब आये, प्यार बरसाये हमको तरसाये.” सोबतच तिने निळ्या रंगाचा हार्ट ईमोजीही बनवला आहे. शिवानीचा निळेशार अंदाज चाहत्यांना चांगलाच भावला आहे. चाहते कमेंट्सच्या माध्यमातून तिच्यावर भरभरून प्रेम व्यक्त करत आहेत. बघता बघताच या फोटोवर ४६ हजारहून अधिक लाईक्स आले आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अभिमानास्पद! ‘स्त्री शक्ती राष्ट्रीय पुरस्कार २०२१’ने उर्वशी रौतेलाचा गौरव; फोटो अन् व्हिडिओ केला शेअर

-‘स्लमडॉग मिलेनियर’ फेम अभिनेत्री लग्नाआधीच होणार आई; फोटो शेअर करत दिली ‘गुडन्यूज’

-अरे व्वा! ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याने रचलाय नवीन विक्रम; आठव्यांदा साकारणार ‘महादेवा’ची भूमिका

हे देखील वाचा