मराठी मालिका या प्रेक्षकांना प्रामुख्याने आवडतात. कारण त्यातील पात्र सर्वांना आपल्या जवळची आणि हवीहवीशी वाटतात. यातीलच कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिका म्हणजे ‘राजा राणी ची गं जोडी.’ या मालिकेत मुख्य भूमिकेत असणारी अभिनेत्री शिवानी सोनार ही चांगलीच प्रसिद्ध झाली आहे. अनेक टॉप अभिनेत्रींना मागे सारून शिवानी आता लोकप्रिय अभिनेत्री झाली आहे. या मालिकेतील तिचे डायलॉग, हावभाव, इमोशन या सगळ्या गोष्टी ती अगदी परफेक्ट करत आहे. तसेच सोशल मीडियावर देखील तिचा चांगलाच वावर असतो. तिने नुकताच सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे.
शिवानीने शेअर केलेला हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, शिवानीने पांढऱ्या रंगाचा स्कर्ट आणि पांढऱ्या रंगाचा टॉप परिधान केला आहे. तसेच तिने पायात मोझडी घातली आहे. तिने हा फोटो शेअर करून लिहिले आहे की, “माझ्या वाढदिवसाचं गिफ्ट मला आधीच मिळाले आहे.” शिवानीचे इंस्टाग्रामवर एक लाख फॉलोवर्स झाले आहेत. यानिमित्त तिने ही पोस्ट केली आहे. तिच्या या पोस्टवर तिचे अनेक चाहते कमेंट करून तिच्या सौंदर्याचे कौतुक करत आहेत तर अनेकजण तिचे अभिनंदन करत आहेत. (Shivani sonar share her beautiful photo on social media, and tell about her pre birthday gift)
शिवानी सध्या घराघरात पोहचली आहे. ‘राजा राणीची गं जोडी’ या मालिकेतील तिचा अभिनय प्रेक्षकांना खूपच आवडत आहे. याआधी तिने ‘गर्लफ्रेंड’ या चित्रपटात एक भूमिका निभावली होती. तसेच तिने ‘पांडू’ आणि ‘अगली डेस्क’ या चित्रपटात देखील काम केले आहे. पण यातून तिला काही फारसी ओळख मिळाली नव्हती. पण या मालिकेने तिची लोकप्रियता शिखराला पोहचवली आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-लाजुन लाल झाला शाहिद कपूर, जेव्हा मीराने शेअर केले बेडरूम सिक्रेट; म्हणाली, ‘मला वाटतं तो कंट्रोल…’