Thursday, April 24, 2025
Home मराठी शिवानी सोनारच्या घरी लगीनघाई; लग्नापूर्वीच्या विधींना झाली सुरुवात

शिवानी सोनारच्या घरी लगीनघाई; लग्नापूर्वीच्या विधींना झाली सुरुवात

सध्या सर्वत्र लगीनसराई सुरू झालेली आहे. मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार देखील लग्न बंधनात अडकत आहेत. 2024 च्या शेवटी देखील अनेक मराठी कलाकार लग्न बंधनात अडकलेले आहेत. आता नवीन वर्षाची सुरुवात झाल्यावर देखील अनेक कलाकार लग्न करणार आहेत. त्यातीलच एक नाव म्हणजे राजा राणीची ग जोडी फेम अभिनेत्री शिवानी सोनार (Shivani Sonar) आणि रंग माझा वेगळा फेल अंबर गणपुळे हे दोघेही लवकरच लग्न बंधनात अडकणार आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी त्यांच्या लग्नाची घोषणा केली होती. तसेच त्यानंतर त्यांचा थाटामाटात साखरपुडा देखील झाल. आणि आता शिवानीच्या घरी लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात झालेली आहेत. आणि याची एक झलक शिवानीने सोशल मीडियावर दाखवलेली आहे.

शिवानी सोनारने सोशल मीडियावर काही फोटो शेअर करून ती लवकरच लग्न करणार असल्याची माहिती दिलेली आहे. इंस्टाग्राम स्टोरीवर तिने एक फोटो शेअर केला आहे. आणि त्या फोटोला नवरी लग्नासाठी तयार असे कॅप्शन दिलेले आहे. तसेच लग्नापूर्वीच्या काही विधींचे फोटो देखील शेअर केलेले आहेत. त्यामुळे आता तिच्या लग्नाबाबत तिच्या चाहत्यांच्या मनात उत्सुकता निर्माण झालेली आहे.

मागील वर्षी गुढीपाडव्याच्या गुढीपाडव्याला म्हणजेच 9 एप्रिल 2024 या दिवशी शिवानी सोनार आणि अंबर गणपुळे यांचा साखरपुडा केला. त्यानंतर त्यांच्या लग्नाची सर्वत्र चर्चा रंगू लागली. काही महिन्यांपूर्वी त्यांची बॅचलर पार्टी देखील जोरात झाली आहे. आणि हाती आलेल्या माहितीनुसार येत्या आठवड्याभरातच शिवानी आणि अंबर लग्न करणार आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा

‘त्यांच्या नावाला काळिंबा तरी फासू नका…’, नाट्यगृहाच्या दुरावस्थेबाबत भाष्य करत शरद पोंक्षे यांनी साधला मुख्यमंत्र्यांवर निशाणा
कियारा आडवाणीचे सुंदर ड्रेसमध्ये फोटोशूट; चाहत्यांनी केला कौतुकाचा वर्षाव

हे देखील वाचा