Tuesday, June 24, 2025
Home अन्य शानदार, जोरदार, जबरदस्त! ‘शिवप्रताप गरुडझेप’ चित्रपटाचा टीझर रिलीज

शानदार, जोरदार, जबरदस्त! ‘शिवप्रताप गरुडझेप’ चित्रपटाचा टीझर रिलीज

मराठी सिनेसृष्टीत सध्या अनेक नवनवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. यामध्ये अनेक ऐतिहासिक चित्रपटही आहेत ज्यांना प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद पाहायला मिळत आहे. छत्रपती शिवरायांच्या काळातील अनेक शूरवीर मावळ्यांच्या आयुष्यावरील हे चित्रपट प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहेत. आता अभिनेते अमोल कोल्हे यांनी त्यांच्या शिवप्रताप गरुडझेप या चित्रपटाचा टीझर शेअर केला आहे. 

अमोल कोल्हे हे मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते म्हणून ओळखले जातात. आपल्या दमदार अभिनयाने आणि ऐतिहासिक भूमिका साकारुन त्यांनी सिने जगतात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. अमोल कोल्हे यांच्या शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या भूमिका चांगल्याच गाजल्या होत्या. या भूमिकांना प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद पाहायला मिळाला. सध्या त्यांचा ऐतिहासिक शिवप्रताप गरुडझेप चित्रपट चांगलाच चर्चेत आला आहे. या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित  करण्यात आला .

अमोल कोल्हे यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन ही पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी “आमच्या हिंदू धर्मावर घाला घालणाऱ्याचे हात मुळासकट उखडून टाकण्याची धमक आम्ही बाळगतो. सह्याद्रीच्या नरसिंहाची शिवगर्जना
‘शिवप्रताप गरुडझेप’ ५ ऑक्टोबर २०२२ पासून चित्रपटगृहांत,आता फक्त २३ दिवस बाकी…  असे म्हणत याबद्दलची पोस्ट शेअर केली आहे.

या पोस्टमध्ये अमोल कोल्हे यांनी ‘शिवप्रताप गरुडझेप’या चित्रपटाचं पोस्टर देखील शेअर केलं आहे. या पोस्टरमध्ये अमोल कोल्हे हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसत आहेत. तर अभिनेते यतीन कार्येकर हे औरंगजेबाच्या भूमिकेत दिसत आहेत.अनेक नेटकऱ्यांनी या टीझरला लाइक केलं आहे. आता प्रेक्षक या चित्रपटाच्या ट्रेलरची उत्सुकतेने वाट बघत आहेत. ‘शिवप्रताप गरुडझेप’ चित्रपटाचा टीझर हा अमोल कोल्हे यांच्या अमोल ते अनमोल या युट्युब चॅनलवरुन शेअर करण्यात आला आहे.

हेही वाचा – अक्षय कुमारच्या जवळच्या व्यक्तिचे निधन; अभिनेता भावूक होत म्हणाला,’अजूनही विश्वास बसत…’
खलिस्तान्यांशी संबंध असल्याच्या आरोपामुळे दुखावला जुबीन नौटियाल; म्हणाला, ‘माझी आई…’
‘बिग बॉस’ स्वत: स्पर्धकांसोबत खेळणार खेळ; पाहा ‘बिग बॉस 16’ची आगळीवेगळी थीम

हे देखील वाचा