अक्षय कुमारच्या जवळच्या व्यक्तिचे निधन; अभिनेता भावूक होत म्हणाला,’अजूनही विश्वास बसत…’

0
65
akshay kumar
photo courtesy:Instagram/akshaykumar

बॉलिवूडमधील सर्वात व्यस्त अभिनेत्यांपैकी एक म्हणजे अक्षय कुमार(Akshay Kumar) वर्षभर बॉक्स ऑफिसवर अनेक चित्रपट देण्यासाठी ओळखला जातो. मात्र, अक्षय कुमारसाठी हे वर्ष चांगले नाही. त्याचे एकापाठोपाठ एक चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप होत आहेत. चित्रपट हिट असो वा फ्लॉप, अक्षय कुमार अनेकदा चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त असतो. प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यापूर्वी तो पडद्यामागची बरीच तयारी करतो. त्याचे डायलॉग, केस, मेकअप यामागे अनेकांचा हात असतो, पण ते कधीच दिसत नाही.

अक्षय कुमार सध्या त्याच्या चित्रपटांमुळे चर्चेत आहेच. पण यादरम्यान त्याने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. अक्षयचा मराठमोळा हेअर स्टायलिस्ट मिलन जाधव यांचं आज निधन झालं आहे. अक्षयने मिलन यांच्याबरोबर फोटो शेअर करत याबाबत माहिती दिली. त्याचबरोबरीने भावनिक पोस्ट शेअर करत त्याने दुःख व्यक्त केलं.

 

View this post on Instagram

 

अक्षयने मिलन जाधव यांच्याबरोबर फोटो शेअर करत म्हटलं की, “उत्तम हेअरस्टाइल आणि तुझ्या हास्याने तू प्रचंड गर्दीतही उठून दिसत होतास. माझा एक केसही इकडे-तिकडे होणार नाही याची तू पुरेपूर काळजी घेतलीस. सेटवरील ते आयुष्य, १५ वर्षांहून अधिक काळ माझा हेअर स्टायलिस्ट म्हणून काम करणारा मिलन जाधव. अजूनही विश्वास बसत नाही की तू आम्हाला सोडून गेला आहेस. मिलानो मला तुझी नेहमीच आठवण येत राहिल. ओम शांती.”

मिलन यांचं निधन कशामुळे झालं याबाबत अजूनही कोणतीच माहिती समोर आली नाही. अक्षयने मिलन जाधव यांच्याबाबत किती वर्ष काम केलं? हे आपल्या पोस्टच्या माध्यमातून सांगितलं आहे. तसेच त्याने दुःख देखील व्यक्त केलं आहे. अक्षय व्यतिरिक्त बॉलिवूडच्या इतर कलाकार मंडळींसाठी देखील मिलन यांनी काम केलं होतं. करीना कपूर खान, कियारा अडवाणीबरोबरचे देखील त्यांचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. अक्षयसह मिलन इतर कलाकार मंडळींचे लाडके होते. अक्षयने पोस्ट शेअर केल्यानंतर अनेकांनी मिलन यांना श्रद्धांजली वाहिली आहे. “अक्षय खरंच खूप दुःखद बातमी. मिलन यांच्या जवळच्या व्यक्तींच्या दुःखामध्ये मी सहभागी आहे.” असं अनिल कपूर यांनी कमेंट करत म्हटलं आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘बिग बॉस’ स्वत: स्पर्धकांसोबत खेळणार खेळ; पाहा ‘बिग बॉस 16’ची आगळीवेगळी थीम

गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये खुलले सनी लिओनीचे सौंदर्य
मुहूर्त ठरला! ‘या’ दिवशी अली फजल आणि रिचा चड्ढा अडकणार विवाह बंधनात, मुंबईत रंगणार रिसेप्शन सोहळा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here