Friday, July 5, 2024

शॉकिंग! सामान खरेदीसाठी निघालेल्या गायिकेसोबत रिक्षाचालकाकडून घृणास्पद कृत्य

कलाविश्वातून काळजाचा थरकाप उडवणारी बातमी समोर येत आहे. कोलकाता येथे एका व्हॅन रिक्षा चालकाने घृणास्पद कृत्य केले आहे. त्या रिक्षा चालकाने एका महिला लोक गायिकेवर लैंगिक अत्या’चार (बला’त्कार) केले आहेत. या प्रकरणाची माहिती शुक्रवारी (दि. १५ जुलै) पोलिसांनी दिली. पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, शुक्रवारी उल्टाडांगा पोलीस स्टेशनमध्ये महिलेने लैंगिक अत्या’चाराचा गुन्हा दाखल केला होता. महिलेच्या तक्रारीनंतर कारवाई करत पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, १२ जुलै रोजी दुपारी दक्षिणदरी भागात राहणारी पीडित महिला घरातील वस्तू विकत घेण्यासाठी तेथून जात होती, तेव्हा ही घटना घडली. त्यावेळी पाऊस असल्यामुळे ती एका शेडखाली थांबली होती. त्याचवेळी आरोपीने तिला पाठीमागून पकडले आणि महिलेला शेजारीच एका जागी घेऊन गेला. तिथे त्याने तिच्यावर अत्या’चार केले.

त्या रिक्षाचालकाने महिलेवर अत्या’चार केल्यानंतर त्या महिला लोक गायिकेने (Woman Folk Singer) परिधान केलेले सोन्याचे दागिणे आणि तिचे सामानही हिसकावून फरार झाला, असे पोलीस अधिकाऱ्याने पुढे सांगितले. त्यांनी सांगितले की, महिला दोन दिवसांपासून आजारी होती. या घटनेनंतर ती घरीच थांबली होती. शुक्रवारी ती तिच्या नातेवाईकांसोबत उल्टाडांगा येथील पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यासाठी पोहोचली होती.

पोलीस अधिकाऱ्याचे असे म्हणणे आहे की, वैद्यकीय तपासणीनंतर अत्या’चाराची पुष्टी झाली आहे. आरोपीविरुद्ध चोरीसोबतच अत्या’चाराचाही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचबरोबर याबाबत कारवाईचा बडगाही उगारला आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

वर्षाकाठी २५ कोटी छापते कॅटरिना, ‘इतक्या’ कोटींची आहे मालकीणबाई; चार वर्षे ठरलीये आशियाची मादक अभिनेत्री

‘हा’ आहे २०२२चा सगळ्यात ‘लोकप्रिय’ चित्रपट, पहा प्रेक्षकांची पसंती नेमकी कोणाला?

‘तु सुखात रहा…’ सुष्मिता सेनच्या नव्या प्रेमप्रकरणावर एक्स बॉयफ्रेंडने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया

हे देखील वाचा