रुपेरी पडद्यावर काम करणाऱ्या कलाकारांना चाहते आपला आदर्श मानत असतात. मात्र, जर याच कलाकारांनी पातळी ओलांडून काही वाईट कृत्य केले, तर त्यांची प्रतिमा चाहत्यांच्या नजरेत मलीन झाल्याशिवाय राहत नाही. असेच काहीसे पुन्हा एकदा घडले आहे. मल्याळम अभिनेता श्रीनाथ भासी याला एका महिला एँकरशी गैरवर्तन केल्याप्रकरणी सोमवारी (दि. 26 सप्टेंबर) अटक करण्यात आली होती. यानंतर पुढं काय झालं, चला जाणून घेऊ…
अभिनेता श्रीनाथ भासी (Sreenath Bhasi) याचे हे प्रकरण मुलाखतीशी संबंधित आहे. श्रीनाथ त्याच्या ‘चिट्टांबी’ या सिनेमाचे प्रमोशन करत होता. यादरम्यान एका युट्यूब चॅनेलवरील मुलाखतीदरम्यान त्याने महिला पत्रकारासोबत गैरवर्तन केले. माध्यमांतील वृत्तांनुसार, सोमवारी त्याला केरळच्या कोच्ची येथे शिवीगाळ केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती आणि आता वैद्यकीय तपासणीनंतर या प्रकरणी त्याची जामीनावर मुक्तता केली आहे.
एँकरच्या या प्रश्नावर भडकला श्रीनाथ आणि केली शिवीगाळ
हाती आलेल्या माहितीनुसार, हे सर्व प्रकरण ‘चिट्टांबी’च्या प्रमोशनवेळी एका युट्यूब चॅनेलच्या एँकरला मुलाखत देत होता. मुलाखतीदरम्यान एँकरने श्रीनाथला प्रश्न विचारला की, ‘तो मल्याळम सिनेसृष्टीतील अभिनेत्यांना त्यांच्या रावडी अंदाजाच्या हिशोबाने किती गुण देऊ इच्छितो?’ या प्रश्नावर अचानक श्रीनाथ रागाने लाल झाला आणि त्याने कॅमेरा बंद केल्यानंतर महिला एँकर आणि क्रू मेंबर्ससह शिवीगाळ करू लागला.
View this post on Instagram
sreenathbhasi
महिला एँकरने केली कारवाई
मुलाखतीदरम्यान महिला एँकरशी अशाप्रकारे वागल्यानंतर लगेच कारवाई केली. महिला एँकरने मागील आठवड्यात श्रीनाथविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. श्रीनाथला भारतीय दंडविधान संहितेच्या 354 ए (1), 509 आणि 294 बी अंतर्गत अटक करण्यात आली. या प्रकरणी ताज्या माहितीनुसार, श्रीनाथला वैद्यकीय तपासणीनंतर जामीनावर सोडण्यात आले आहे.
श्रीनाथची कारकीर्द
श्रीनाथ याने हास्य अभिनेता म्हणून मल्याळम इंडस्ट्रीत नाव कमावले आहे. त्याने त्याच्या कारकीर्दीची सुरुवात संगीत इंडस्ट्रीतून केली होती. तो मॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक आहे. श्रीनाथच्या सिनेमांमध्ये ‘होम’, ‘सुमेश’ आणि ‘रमेश’ यांसारख्या सिनेमांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, ‘चिट्टांबी’ या मल्याळम सिनेमातून तो पहिल्यांदा मुख्य अभिनेता म्हणून चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
अभिनेत्री रसिकासाठी नवरात्र आहे खूपच खास, 250 नेत्रहीन मुलींसोबत लुटला गरब्याचा आनंद
इंडियन आयडॉलवर संतापले प्रेक्षक, थेट बॉयकॉट करण्याची केली मागणी