Thursday, March 28, 2024

अभिनेत्री रसिकासाठी नवरात्र आहे खूपच खास, 250 नेत्रहीन मुलींसोबत लुटला गरब्याचा आनंद

कोरोना काळानंतर तब्बल दोन वर्षांनी सर्वत्र सणांचा उत्साह पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच राज्यभरात गणेशोत्सवाचा जल्लोश पाहायला मिळाला. गणेशोत्सव संपताच सर्वत्र नवरात्रोत्सवाची लगबग सुरू असून नऊ दिवस चालणाऱ्या या उत्सवाची सर्वत्रच धामधुम पाहायला मिळत आहे. यामध्ये मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्रीही मागे नाहीत. सोशल मीडियावर मराठी कलाकारांचे फोटो आणि व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहेत. यामध्ये अभिनेत्री रसिका सुनीलच्या पोस्टने सर्वांचेच लक्ष वेधले आहे. ज्यामध्ये तिने ही नवरात्रोत्सव खूपच खास असल्याचे म्हणले आहे. 

अभिनेत्री रसिका सुनील (Rasika Sunil) सोशल मीडियावर खूपच सक्रिय असते. आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन ती नेहमीच विविध फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. नुकताच तिने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये रसिकाने कमला मेहना ब्लाइंड स्कूल, दादरला भेट दिल्याचे सांगितले आहे. त्याचबरोबर या भेटीत रसिकाने  250 नेत्रहीन मुलींसोबत गरब्याचा आनंद लुटला आहे. या बद्दलची पोस्ट तिने चाहत्यांशी शेअर केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rasika Sunil (@rasika123s)

या पोस्टमध्ये रसिकाने “ही नवरात्र खूप स्पेशल होती. नवरात्रच्या निमित्तानं मला या खूप गोड मुलींना भेटता आलं. त्यांची सुंदर शाळा बघता आली त्याचबरोबर संयमी आणि प्रेमळ शिक्षकांना भेटले. दांडियाला सेलो टेप लावून स्पर्शाने ओळखून खालचा, वरचा भाग रंगवून या गोड मुली दांडिया बनवतात. या मुलींना अशाच युक्त्या वापरुन अनेक कला अवगत आहेत. त्यांच्या शिक्षकांचंही तेवढंच कौतुक” अशा शब्दात तिचा आनंद व्यक्त केला आहे. त्याचबरोबर रसिकाने या पोस्टमध्ये धाडस, चिकाटी आणि प्रेम हे सगळ या मुलींकडून शिकण्यासारखं आहे अस म्हणत त्यांचे कौतुकही केले आहे.

रसिकाच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. दरम्यान रसिकाने माझ्या नवऱ्याची बायको मालिकेत शनायाची भूमिका साकारली होती. या भूमिकेने तिला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. मालिकेतील तिच्या अभिनयाचे जोरदार कौतुक झाले होते.

हेही वाचा- इंडियन आयडॉलवर संतापले प्रेक्षक, थेट बॉयकॉट करण्याची केली मागणी
सहाय्यक दिग्दर्शक म्हणून सुरुवात केलेल्या यश चोप्रा यांनी, शाहरुखसह अनेक कलाकारांना बनवले सुपरस्टार
खलनायकी साकारणारून राहुल यांनी मिळवलीय लोकप्रियता; वयाच्या 54व्या वर्षी ‘या’ अभिनेत्रीसह आहेत ‘लिव्ह-इन’मध्ये

हे देखील वाचा