Sunday, March 15, 2026
Home साऊथ सिनेमा धक्कादायक! साऊथच्या प्रसिद्ध अभिनेत्याच्या आत्महत्येने हादरली सिनेइंडस्ट्री, 34व्या वयात सोडले जग

धक्कादायक! साऊथच्या प्रसिद्ध अभिनेत्याच्या आत्महत्येने हादरली सिनेइंडस्ट्री, 34व्या वयात सोडले जग

साऊथ इंडस्ट्रीतून दु:खद आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध तमिळ टीव्ही अभिनेता लोकेश राजेंद्रन याने आत्महत्या केली. तो 34 वर्षांचा होता. ही घटना मंगळवारी (दि. 4 ऑक्टोबर) घडली होती. ही बातमी समोर येताच, सर्वत्र एकच खळबळ माजली आहे. लोकेश हा ‘मरमादेशम’ या टीव्ही मालिकेतून बालकलाकार म्हणून घराघरात पोहोचला होता. त्याव्यतिरिक्त त्याने अनेक मालिकातही काम केले होते. त्याच्या निधनामुळे कलाविश्वावर शोककला पसरली आहे.

लोकेश राजेंद्रन (Lokesh Rajendran) यांच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिनेत्याने 150 मालिकांमध्ये काम केले होते. याव्यतिरिक्त तो तमिळ इंडस्ट्रीतील विजयकांत, प्रभू यांच्यासह इतर अनेक प्रसिद्ध कलाकारांसोबत 15 सिनेमांमध्ये झळकला होता. तो विवाहित होता आणि त्याला 2 अपत्य आहेत. त्यांनी सांगितले की, “काही महिन्यांपूर्वी समजले होते की, लोकेश आणि त्याच्या पत्नीमध्ये काही गैरसमज झाले होते.”

पत्नीशी झालेली बाचाबाची
अभिनेत्याच्या वडिलांनी पुढे बोलताना सांगितले की, “त्याच्या पत्नीने चार दिवसांपूर्वीच लोकेशला घटस्फोटाचे पेपर पाठवले होते. तो नैराश्येत होता. मी त्याला शेवटचे शुक्रवारी पाहिले होते. तो मला म्हणालेला की, त्याला काही पैशांची गरज आहे. मी त्याला ते पैसेही दिले होते. त्याने आम्हाला हे सांगितले होते की, तो आता एडिटर म्हणून काम सुरू करणार आहे.”

https://mobile.twitter.com/dirlokesh/status/1287885910189588482

बस स्थानकावर दिसलेला लोकेश
दुसरीकडे, पोलिसांनी सांगितले की, लोकेशला त्याच्या कौटुंबिक कारणांमुळे दारूचे व्यसन लागले होते. तो नेहमी चेन्नईच्या मुफस्सिल बस स्थानकावर झोपताना दिसायचा. सोमवारी (दि. 3 ऑक्टोबर) बस स्थानकावर काही प्रवाशांनी पाहिले की, तो व्यवस्थित नव्हता. त्यातील काही लोकांनी रुग्णवाहिकेसाठी 108 क्रमांकावर कॉलही केला होता आणि पोलिसांनाही याबाबत माहिती दिली होती.

हेही वाचा- प्रख्यात गायक उदित नारायण यांना हार्ट अटॅक, प्रकृती अत्यंत गंभीर! जाणून घ्या व्हायरल मेसेजमागील सत्य

पोलीस करतायेत प्रकरणाचा तपास
पोलिसांच्या माहितीनुसार, अभिनेता लोकेश राजेंद्रन याला राजकीय किलपौक मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयात नेण्यात आले. मंगळवारी (दि. 4 ऑक्टोबर) त्याने जगाचा निरोप घेतला. पोलिसांनी सीआरपीसीच्या कलम 174 अंतर्गत तक्रार दाखल केली आहे. तसेच, पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

अभिनेत्याच्या निधनामुळे कलाविश्वाचे मोठे नुकसान झाले आहे, जे कधीच भरून निघणार नाही. त्याचे चाहते आणि इतर कलाकार त्याच्या निधनावर शोक व्यक्त करत त्याला श्रद्धांजली वाहत आहेत.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
भाजप आमदार राम कदमांचा इशारा! म्हणाले, ‘आदिपुरुष महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही’
बाबो! ‘रावणा’ने हेमा मालिनीच्या कानाखाली वाजवलेल्या 20 चापटा, कारण जाणून तुम्हालाही बसेल धक्का

हे देखील वाचा