Monday, July 1, 2024

‘तुझ्यात ते टॅलेंट नाही जे….’;मौनी रॉयने शेअर केला अभिनयाचा खडतर प्रवास

छोट्या पडद्यावरुन बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवणारी अभिनेत्री मौनी रॉय (mouny Roy) सोशल मीडियावर नेहमी चर्चेत आहे. आपल्या चाहत्यांसाठी मौनी नेहमी काही ना काही शेअर करत असते. मौनी हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. मौनी रॉय हिने अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारत चाहत्यांच्या मनावर राज्य केल आहे. पण तिचा इथपर्यंतचा प्रवास खुप खडतर असल्याची खंत मौनीने मीडियाशी संवाद साधताना व्यक्त केली आहे.

करण जोहरसोबत काम करणे हे कोणत्याही बॉलिवूड स्टारसाठी स्वप्नासारखे असते. सध्या मौनी रॉय ‘धर्मा प्रोडक्शन’च्या शो ‘शो टाइममध्ये काम करत आहे. यावेळी तिनं माध्यमांशी संवाद साधताना मन मोकळं केलं आहे.
‘जेव्हा मी कोणत्याही चित्रपटाच्या ऑडिशनला जायची तेव्हा लोक मला नाकारायचे. टीव्ही इंडस्ट्रीमधून आल्याने मला अभिनय करता येणार नाही, असे त्यांना वाटत होते.

तसेच ती पुढे म्हणाली, सुरुवातीच्या काळात जेव्हा मी कोणत्याही दिग्दर्शकाकडे काम मागायला जायची तेव्हा तुझ्यात कोणते स्टार गुण नाही. तुम्ही मोठ्या पडद्यासाठी बनलेले नाही. असे ऐकवायचे. पण खरं सांगायचे झाले तर माझ्या मनात कोणाबद्दलही कटुता नाही. मला फक्त माझ्या कामावर लक्ष केंद्रित करायचे आहे. अशी भावना व्यक्त करत मौनीने आपला खडतर प्रवास सांगितला.

मौनिच्या वर्कफ्रटबद्दल बोलायचे झाले तर, मौनी रॉय सध्या ‘धर्मा प्रोडक्शन’च्या शो ‘शो टाइममध्ये काम करत आहे. यापूर्वी तिने ‘ब्रह्मास्त्र’ आपली भूमिका बजावत चाहत्यांचे मनं जिंकले. काही दिवसांपूर्वी मौनी कोयंबतूरमधील महादेवाच्या मंदिरात दर्शन घेताना दिसली. यावेळी तिनं गुलाबी रंगाचा सूट परिधान केला आहे. या लूकमध्ये मौनी अतिशय सुंदर दिसत होती.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

प्रेमाच्या रंगात रंगले आदित्य आणि अनन्या, एकत्र केला व्हॅलेंटाईन डे साजरा
शिवरायांचा छावा १६ फेब्रुवारीला चित्रपटगृहात होणार प्रदर्शित, वाचा सविस्तर

हे देखील वाचा