Thursday, April 24, 2025
Home अन्य क्या बात है! लग्नाचे रीतिरिवाज पूर्ण करताना, श्रद्धाने दाखवली तिच्या होणाऱ्या नवऱ्याची झलक

क्या बात है! लग्नाचे रीतिरिवाज पूर्ण करताना, श्रद्धाने दाखवली तिच्या होणाऱ्या नवऱ्याची झलक

सिनेसृष्टीतील आणि मालिकांमधील कलाकार तसेच त्यांचे लग्न सोहळे मोठ्या जल्लोषात होताना दिसतात. अनेक जण सोशल मीडियावरुन त्यांच्या लग्नाचे सर्व अपडेट चाहत्यांना देत असतात. अशात या कलाकारांचे लग्न पाहण्यासाठी चाहते देखील मोठे उत्सुक असतात. लवकरच अभिनेत्री श्रद्धा आर्या लग्नगाठीत अडकणार आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर तिच्याच लग्नाची चर्चा होताना दिसते.

श्रद्धाच्या लग्नाची जोरदार तयारी सुरू झाली आहे. तिचे काही रीतीरिवाज देखील पूर्ण झाले आहेत. काही दिवांपूर्वीच तिने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर या सर्वांचे फोटो आणि व्हिडिओ शेअर केले होते. अशात आता तिने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर होणाऱ्या पतीचा फोटो देखील पोस्ट केला आहे. फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, तिच्या होणाऱ्या पतीच्या हातावर मेहेंदी काढलेली आहे. यामध्ये हार्ट शेप आणि श्रद्धाचे नाव लिहिलेले दिसत आहे. तसेच त्याने काळ्या रंगाचा टी शर्ट परिधान केलेला आहे आणि गळ्यामध्ये ‘ग्रूम टू बी’ म्हणजेच ‘होणारा नवरदेव’ असे लिहिलेला पट्टा घातला आहे. श्रद्धा एका नेवी अधिकारी बरोबर लग्न बंधनात अडकणार आहे. १६ नोव्हेंबर रोजी मोठ्या धूमधडाक्यात तिचा लग्न सोहळा पार पडेल. (shraddha arya shares a photo of the groom flaunting her name on his hand with mehndi)

या फोटोसह तिने आणखीन एक फोटो स्टोरीमध्ये शेअर केला आहे. यामध्ये तिने गुलाबी रंगाचे टीशर्ट आणि पँट घतली आहे. तसेच ती पिझ्झा खाताना दिसत आहे. हा फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “खास जेवण, खास दिवसासाठी.” श्रद्धाने एक व्हिडिओ देखील पोस्ट केला आहे. यामध्ये ती तिच्या मित्र मैत्रिणींसह मजा मस्ती करताना दिसते.

अभिनेत्रीने आजवर छोट्या पडद्यावर तिच्या अभिनयाने मोठा धमाका केला आहे. २०१७ मध्ये आलेली मालिका ‘कुंडली भाग्य’मुळे ती प्रसिद्ध झाली. श्रद्धाने काही तमिळ, तेलुगू, मल्याळम, पंजाबी आणि हिंदी भाषिक चित्रपटांमध्ये देखील अभिनय केला आहे. बॉलिवूडमधील ‘पाठशाला’ या चित्रपटामध्ये ती नाताशाच्या भूमिकेत दिसली होती.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-सलमान अन् राणीने ‘तेरी चुनरिया’वर केला जबरदस्त डान्स, चाहत्यांच्या आठवणी झाल्या ताज्या

-कंगना रणौतला पुरस्कार, पण तुमच्या नावाचा विचार का नाही झाला? पाहा या प्रश्नावर काय म्हणाला सोनू सूद

-मलायका अन् लहान मुलांची जबरदस्त बॉंडिंग, चिमुकल्याने गाल ओढताच अभिनेत्रीने मारली मिठी

हे देखील वाचा