Saturday, July 6, 2024

लग्नाच्या चर्चांमध्ये श्रद्धा कपूरच्या ब्रायडल लूकचे फोटो व्हायरल, शक्ती कपूर यांनी केला लग्नाच्या चर्चांवर खुलासा

लग्न म्हटलं की गाजावाजा, धुमाकुळ आणि मौज मस्ती या गोष्टी आल्याच. गरीब असो वा श्रीमंत प्रत्येक वडील आपल्या मुलीचे लग्न धुमधडाक्यात लावून देतात. प्रत्येक नवरीला आपल्या लग्नाच्या दिवशी खास आणि सगळ्यांमध्ये उठून दिसायचे असते. यासाठी अनेक मुली महागड्या पार्लरमध्ये जातात. साड्या तसेच डिझायनर महागडे घागरे घेतात. अशात बॉलिवूड मधील अनुष्का शर्मा-विराट कोहली आणि दीपिका पदुकोण-रणवीर सिंग या दोन जोडप्यांचे लग्न चांगलेच गाजले होते. सध्या अभिनेत्री श्रद्धा कपूरच्या लग्नाची चर्चा रंगू लागली आहे.

श्रद्धा तिच्या दमदार अभिनयाने चाहत्यांची मने जिंकते. तसेच तिचे दिलखेच लूक चाहत्यांना नेहमीच घायाळ करतात. अशात श्रद्धाचे लग्नातील घागऱ्यावरचे फोटो सध्या चांगलेच चर्चेत आहेत. तिच्या या ब्रायडल लूकने चाहते तिच्या या फोटोंकडे एकटक पाहत आहेत. यामध्ये तिचे सौंदर्य आणखीनच खुलून आले आहे. तिने लाल रंगाचा नक्षीदार घागरा परिधान केला आहे. या घागऱ्यावर अतिशय बारीक नक्षीकाम करण्यात आले आहे. यामध्ये तिने लाल रंगाचे मोठे दागिने देखील घातले आहेत. या पूर्ण लूकने तिचे चाहते पुरते भारावून गेले आहेत.

तिने लाल घागऱ्याबरोबरच आणखीन एक सोनेरी रंगाचा घागरा घातला आहे. हा घागरा देखील अफलातून सुंदर आहे. तिने यामध्ये केसांचे फ्लॅट लूक ठेवले आहे. श्रद्धाने परिधान केलेले दागिने आणि चेहऱ्यावरली मधुर हास्य पाहून चाहत्यांना भुरळ पडली आहे. तिने पोस्ट केलेल्या या फोटोंमुळे आता श्रद्धा देखील लग्नगाठीत अडकणार अशी चर्चा तिच्या चाहत्यांमध्ये सुरु आहे. फोटोग्राफर रोहन श्रेष्ठ बरोबर ती लग्न करणार असे नेटकर्‍यांना वाटत आहे. परंतु अद्याप तिने तिच्या लग्नाविषयी कोणताही खुलासा केलेला नाही.

श्रद्धाने तिच्या लग्नाविषयी सुरु असलेल्या चर्चेवर अद्याप मौन बाळगले असले, तरी तिच्या वडिलांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये शक्ती कपूर म्हणाले की, “सध्या सर्वच मुले आपल्या मनाने जोडीदार निवडतात आणि लग्न करतात. रोहन श्रेष्ठला मी चांगलंच ओळखतो. तो आमच्या जवळच्या नातेवाईकाचा मुलगा आहे. अनेक समारंभांमध्ये आम्ही भेटतो. अनेक वेळा तो आमच्या घरी देखील आला आहे. परंतु त्याने अद्याप माझ्याकडे श्रद्धाचा हात मागितला नाही. परंतु त्या दोघांना लग्न करायचे असेल, तर माझी काहीच हरकत नाही. माझी मुलगी सध्या तरी तिच्या करिअरवर लक्ष केंद्रित करत आहे.”

शक्ती कपूर यांनी दिलेल्या या प्रतिक्रियेमुळे श्रद्धा सध्या लग्न करणार नाही असे समजत आहे. तिचे व्हायरल होत असलेले हे फोटो तिने तिच्या ब्रायडल लूकसाठी शूट केले होते.

 

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-बॉलिवूडच्या ‘अशा’ जोड्या जे एकमेकांपासून राहतात वेगवेगळे, पण अजूनही घेतला नाही घटस्फोट

-हद्द झाली! अमायरा दस्तूरने घातली ‘अशी’ बिकिनी; नेटकरी म्हणाले, ‘यांना नग्न व्हायला…’

-राखी सावंतने केली नाकाची शस्त्रक्रिया; व्हिडिओ शेअर करत सांगितले शस्त्रक्रियेचे कारण

हे देखील वाचा