Sunday, September 8, 2024
Home बॉलीवूड लग्नानंतर पार्टनर सोबत कशी राहणार? श्रद्धा कपूरने केले मजेशीर खुलासे…

लग्नानंतर पार्टनर सोबत कशी राहणार? श्रद्धा कपूरने केले मजेशीर खुलासे…

श्रद्धा कपूर तिच्या हॉरर-कॉमेडी चित्रपट ‘स्त्री 2’मुळे सध्या चर्चेत आहे. याशिवाय श्रद्धा तिच्या प्रेमसंबंधांमुळेही अनेकदा चर्चेत असते. काही वर्षांपूर्वी एका मुलाखतीदरम्यान श्रद्धाने तिच्या लग्नाबद्दल खुलेपणाने आपले मत व्यक्त केले होते. यासोबतच श्रद्धाने तिच्या होणाऱ्या पार्टनरबाबत तिच्या मनातील एक खास गोष्टही सांगितली होती.

श्रद्धा कपूर सध्या ‘स्त्री 2’ च्या यशाचा आनंद घेत आहे. ‘स्त्री 2’ रिलीज झाल्यापासून श्रद्धाच्या फॅन फॉलोइंगमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. तिने इन्स्टाग्रामवर अनेक दिग्गजांना पराभूत केले आहे. सध्या श्रद्धा इंस्टाग्रामवर सर्वात जास्त फोलो केले जाण्याबाबत तिसऱ्या क्रमांकावर आहे. 

श्रद्धाला तिच्या शांत स्वभावामुळे डाउन टू अर्थ मानले जाते आणि ती सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांना अनेकदा सकारात्मक मेसेज देत असते. एका मुलाखतीदरम्यान श्रद्धाने तिच्या लग्नाबाबत आपले मत उघडपणे मांडले होते. श्रद्धाने सांगितले होते की ती तिच्या जोडीदारासह “पूर्णपणे आनंदी” आहे.

२०२० मध्ये स्ट्रीट डान्सर 3D च्या प्रमोशन दरम्यान हे घडले होते, जेव्हा श्रद्धने सांगितले होते की लग्नानंतर ती स्वतःला कशी पाहते. श्रद्धाने सांगितले की ती  तिच्या जोडीदाराप्रमाणेच विक्षिप्तपणाच्या सारख्याच पातळीवर असणे आवश्यक आहे. श्रद्धा पुढे म्हणाली होती, “जेव्हा केव्हा मी लग्न करेन,तेव्हा मला त्या व्यक्तीशी पूर्णपणे जुळवून घ्यावे लागेल. दोघांनी एकमेकांना व्यवस्थित समजून घेणे ही माझ्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे.” 

दरम्यान, श्रद्धा कपूरने अलीकडेच ‘स्त्री 2’ रिलीज होत असताना तिच्या कथित बॉयफ्रेंड राहुल मोदीला इन्स्टाग्रामवर अनफॉलो केले होते. वृत्तानुसार, श्रद्धाने राहुलची बहीण, त्याचे प्रॉडक्शन हाऊस आणि त्याच्या कुत्र्याचे अकाउंट देखील अनफॉलो केले होते. जुलैमध्ये श्रद्धाने राहुलसोबतचे नाते सोशल मीडियावर दाखवल्यानंतर तीने हे पाऊल उचलले. श्रद्धाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर तिचा कथित बॉयफ्रेंड राहुलसोबतचा एक फोटो शेअर केला होता, ज्यामध्ये दोघेही पांढऱ्या पोशाखात दिसत होते. त्यावेळी श्रद्धाने कॅप्शनमध्ये एक मजेशीर नोट लिहिली होती, “हृदय ठेव, झोप तरी परत दे यार.”

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा –

आनंद एल राय यांनी ‘तनु वेड्स मनू 3’ च्या शूटिंगवर दिले मोठे अपडेट

 

author avatar
Tejswini Patil

हे देखील वाचा