नव्वदच्या दशकातील लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्यांच्या यादीत शक्ति कपूर यांचे नाव घेतले जाते. आपल्या दमदार अभिनयाने आणि आव्हानात्मक भूमिका साकारुन त्यांनी सिने जगतात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. दिनांक( ३, सप्टेंबर ) रोजी शक्ति कपूर यांचा वाढदिवस सर्वत्र साजरा केला गेला. सध्या सोशल मीडियावर अभिनेत्री श्रद्धा कपूरचाही एक फोटो चांगलाच व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तिने वडिलांना खास अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत.
शक्ती हे हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकार आहेत, जे80 च्या दशकापासून आपल्या दमदार अभिनयाने चाहत्यांचे मनोरंजन करत आहेत. चित्रपट कारकिर्दीत शक्ति कपूर यांनी शेकडो चित्रपट केले असून या सर्व चित्रपटातील अभिनयाने त्यांनी सर्वांची मने जिंकली आहेत. यादरम्यान शक्ती कपूर यांनी मुख्यतः नकारात्मक आणि विनोदी भूमिका केल्या आहेत. सध्या श्रद्धा कपूरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
श्रद्धा कपूरने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये श्रद्धा तिचा भाऊ सिद्धांत कपूर आणि वडील शक्ती कपूर यांच्यासोबत दिसणार आहे. वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना श्रद्धा कपूरने लिहिले की, “वाढदिवसाच्या शुभेच्छा बापू, मी तुझ्यावर खुप प्रेम करते, मला वाटतं तुम्हाला अभिमान वाटेल असं थोडं तरी काम मी केल असेल.” श्रद्धा कपूरच्या या फोटोला सोशल मीडियावर खूप पसंती दिली जात आहे. या पोस्टवर चाहत्यांच्या जोरदार प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.
श्रद्धा कपूर अनेक दिवसांपासून चित्रपटांपासून दूर आहे. श्रद्धा कपूर शेवटची साउथ सिनेमाचा सुपरस्टार प्रभाससोबत साहो या चित्रपटात दिसली होती. पण श्रद्धाच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे की पुढच्या वर्षी ती मोठ्या पडद्यावर कमबॅक करताना दिसणार आहे. दिग्दर्शक लव रंजनच्या अनटाइटल्ड चित्रपटाचे शूटिंग पूर्ण करून श्रद्धा कपूर नुकतीच स्पेनहून परतली असल्याची माहिती आहे. या चित्रपटात श्रद्धा कपूरसोबत सुपरस्टार रणबीर कपूर दिसणार आहे. हा चित्रपट 2023 मध्ये प्रदर्शित होऊ शकतो.
हेही वाचा – स्ट्रगलच्या दिवसात नोरा फतेहीने श्रद्धा कपूरला शिकवला आहे डान्स, वाचा त्यांचा किस्सा
सलमान खानची 16 वर्षापुर्वीची जाहिरात व्हायरल, ‘या’ दिग्गज अभिनेत्याच्या आईसोबत केले होते काम
ऋषी कपूर यांच्या हट्टामुळे ‘या’ सुपरहिट चित्रपटाला दिला होता नकार, नीतू कपूर यांनी केला खुलासा