Tuesday, July 23, 2024

ऋषी कपूर यांच्या हट्टामुळे ‘या’ सुपरहिट चित्रपटाला दिला होता नकार, नीतू कपूर यांनी केला खुलासा

दिग्दर्शक-निर्मात्याला एखाद्या अभिनेत्याला चित्रपटात घ्यायचे असते आणि बळजबरीने दुसऱ्याला ती भूमिका घ्यावी लागते, असे चित्रपटांमध्ये अनेकदा घडते. करण जोहरच्या 2003 मध्ये आलेल्या ‘कल हो ना हो’ या चित्रपटाशीही अशीच कथा जोडली आहे. या चित्रपटात जया बच्चन यांनीही विशेष भूमिका साकारली होती, पण त्या व्यक्तिरेखेसाठी ती करण जोहरची पहिली पसंती नव्हती हे फार कमी लोकांना माहीत असेल. करण जोहरला (karan johar) त्या भूमिकेसाठी नीतू कपूरला कास्ट करायचे होते. याचा खुलासा खुद्द नीतू कपूर यांनी केला आहे. काय आहे हे संपूर्ण प्रकरण चला जाणून घेऊ. 

नीतू कपूरने (neetu kapoor) यांनी  एका मुलाखतीत खुलासा केला होता की, त्यांना अभिनय करायचा नव्हता आणि पती ऋषी कपूर यांनी तिला कधीही काम करण्यास मनाई केली नाही. पण नीतू कपूरच्या यांच्या म्हणण्यानुसार, ऋषी कपूर त्यांच्याबद्दल खूप सकारात्मक असण्याबद्दल असुरक्षित होते. ते एख क्षणही त्यांना सोडून राहत नसतं. सतत ते नितू कपूर यांच्या काळजीत पडलेल दिसायचे.  याच कारणामुळे नीतू कपूरने करण जोहरच्या कल हो ना हो या चित्रपटात काम करण्यास नकार दिला होता. त्यांनी नकार दिल्यानंतर ते पात्र जया बच्चन यांनी साकारले होते.

दरम्यान नुकतीच अभिनेत्री आलिया भट्टने गुड न्यूज दिली आहे. त्यामुळे नितू कपूर लवकरच आजी होणार आहेत.
यासोबतच त्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या जुग जुग जियो या चित्रपटात दिसली होती, ज्यामध्ये तिच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले होते. नीतू कपूर अनेक रिलॅलिटी शोमध्येही भाग घेताना दिसत असतात.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा –
काय सांगता! ऋषी कपूर स्वतःच्या लग्नात पडले होते बेशुद्ध, नीतू कपूर यांनी सांगितला मजेशीर किस्सा
बिनधास्त, बेधडक आणि जेंटलमॅन असणाऱ्या ऋषी कपूर यांच्याबद्दल ‘या’ गोष्टी तुम्हास ठाऊक आहेत का?
अधुरी प्रेम कहाणी! या व्यक्तीमुळे आला ऋषी कपूर आणि डिंपल कपाडिया यांच्यात दुरावा

हे देखील वाचा