Tuesday, June 24, 2025
Home मराठी ‘चला हवा येऊ द्या’ मधील कलाकारांनी देखील धरला ‘लेझी लॅड’ गाण्यावर ठेका, एकदा नजर टाकाच

‘चला हवा येऊ द्या’ मधील कलाकारांनी देखील धरला ‘लेझी लॅड’ गाण्यावर ठेका, एकदा नजर टाकाच

विनोद हा मनोरंजन सृष्टीतील एक महत्वाचा भाग आहे. मराठीमध्ये अनेक विनोदी कलाकार आहेत ज्यांनी चित्रपटात विनोदी व्यक्तीरेखा साकारून प्रेक्षकांना हसवले आहे. मराठीमध्ये अनेक विनोदी शो देखील सुरू झाले आहेत. सुरुवातीला या विनोदी शोमध्ये केवळ पुरुष सदस्य सहभागी होत असल्याचे दिसून आले आहे. परंतु या सगळ्या गोष्टींना डावलून आता अनेक महिला देखील विनोदी व्यक्तिरेखा साकारताना दिसत आहेत.

झी मराठीवरील ‘चला हवा येऊ द्या’ या शोने आख्ख्या महाराष्ट्राला वेड लावले आहे. या शोमध्ये सुरुवातीला केवळ एकच महिला कलाकार होती. ती म्हणजे श्रेया बुगडे. एकटी असणारी ही अभिनेत्री मात्र सगळ्या पुरुषांना भारी पडत होती. या शोमध्ये आणखी एका महिला कलाकाराचे आगमन झाले. ती म्हणजे स्नेहल शिदम. स्नेहलने देखील तिच्या अभिनयाने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. अशातच स्नेहल आणि श्रेयाचा एक व्हिडिओ समोर आला आहे. (shreya bugade and snehal shidam dance video viral on social media)

स्नेहलने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये त्या दोघी ट्रेंडिंग गाणे ‘लेझी लॅड’वर डान्स करताना दिसत आहे. दोघीही या व्हिडिओमध्ये खूप सुंदर दिसत आहे. श्रेयाने या व्हिडिओमध्ये गुलाबी रंगाची साडी नेसली आहे, तर स्नेहलने निळ्या रंगाचा ड्रेस घातला आहे. दोघीही या गाण्याच्या डान्स स्टेप्स फॉलो करत आहेत.

shreya bugade

हा व्हिडिओ शेअर करून तिने कॅप्शन दिले आहे की, “हे पण करून पाहिलं.” अनेकजण या व्हिडिओवर त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. त्यांचे अनेक चाहते कमेंट करून त्यांच्या डान्सचे कौतुक करत आहेत. या व्हिडिओवर अभिनेत्री रेश्मा शिंदे हिने “वाह वाह फायनली”, अशी कमेंट केली आहे.

श्रेया आणि स्नेहल या दोघीही आज महाराष्ट्राच्या घराघरात पोहचल्या आहेत. त्यांच्या निखळ विनोदाने सगळेच हसून हसून लोटपोट होतात. स्नेहलने बाकी अनेक मालिकांमध्ये देखील काम केले आहे.

हेही वाचा : 

RRR खतरनाक! निलेश साबळेने शेअर केला सेटवरच्या डान्स प्रॅक्टिस व्हिडिओ, ‘हा’ डान्स पाहून हसून व्हाल बेजार

‘अविरत राहिली ती फक्त तुझी साथ’, लग्नाच्या २४ व्या वाढदिवशी प्रसाद ओककडून पत्नीला खास शुभेच्छा

‘भोजपुरी क्वीन’ निधीच्या ‘या’ नवीन गाण्याचा युट्यूबवर राडा, अभिनेत्रीचे लटके- झटके वेधतायत सर्वांचे लक्ष

 

हे देखील वाचा