Sunday, January 26, 2025
Home भोजपूरी ‘भोजपुरी क्वीन’ निधीच्या ‘या’ नवीन गाण्याचा युट्यूबवर राडा, अभिनेत्रीचे लटके- झटके वेधतायत सर्वांचे लक्ष

‘भोजपुरी क्वीन’ निधीच्या ‘या’ नवीन गाण्याचा युट्यूबवर राडा, अभिनेत्रीचे लटके- झटके वेधतायत सर्वांचे लक्ष

भोजपुरी गाणी सध्या युट्यूबवर धुमाकूळ घालत आहेत. भोजपुरी अभिनेता यश कुमार आणि अभिनेत्री ‘भोजपुरी क्वीन’ निधी झा यांच्या ‘शंकर’ चित्रपटाची गाणी आधीच सुपरहिट झाली आहेत. त्याचवेळी आता याच चित्रपटातील आणखी एक गाणे प्रदर्शित झाले आहे. या गाण्याने प्रदर्शित होताच इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. या गाण्यात निधी यशसोबत देसी डान्स करताना दिसत आहे.

निधीच्या (Nidhi Jha) या नवीन डान्स व्हिडिओने काही वेळातच इंटरनेटवर अक्षरश: राडा केला आहे. निधीच्या या गाण्याचे नाव ‘काम भर काम हो गईल’ असे आहे. या गाण्यात निधी यशसोबत देसी लटके- झटके दाखवताना दिसत आहे.

निधीच्या ‘काम भर काम हो गईल’ (Kaam Bhar Kaam Ho Gayil) या गाण्याला ओम झा आणि नीतू श्री यांनी आपला आवाज दिला आहे. गाण्याचे बोल अजित मंडल यांनी लिहिले आहेत. त्याचबरोबर या भोजपुरी गाण्याला ओम झा यांनी संगीत दिले आहे. प्रदर्शित होताच या गाण्याने युट्यूबच्या सर्च लिस्टमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे.

निधीचे हे लेटेस्ट भोजपुरी गाणे शुक्रवारी (७ जानेवारी) वर्ल्डवाईड रेकॉर्ड्स भोजपुरी या युट्यूबवर प्रदर्शित करण्यात आले आहे. हे भोजपुरी गाणे प्रदर्शित होताच ते इंटरनेटवर व्हायरल होऊ लागले आहे. निधीच्या या गाण्यावर चाहत्यांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया येत आहेत. यासोबतच हा व्हिडिओ युट्यूबवर वारंवार पाहिला जात आहे. निधीच्या या नवीनतम भोजपुरी गाण्याला आतापर्यंत युट्यूबवर लाखो व्ह्यूज मिळाले आहेत.

दुसरीकडे, त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले, तर नुकतेच निधी झा हिने यश कुमारसोबतच्या नातेसंबंधाची कबुली दिली होती. त्यानंतर यश (Yash Kumar) आणि त्याच्या पत्नीमध्ये अंतर येऊ लागले. यश आणि त्याची पत्नी
दोघांनी एकमेकांपासून घटस्फोट घेतला आहे.

हेही नक्की वाचा-

हेही पाहा-

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा